Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ८०० रूपयांनी स्वस्त, वाचा जळगाव-पुण्यातील ताजे दर

Jalgaon Sarafa bajar gold rate today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जळगावातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. प्रतितोळा तब्बल ८०० रुपयांची घट झाली आहे. जळगाव आणि पुण्यातील आजचे ताजे सोने-चांदीचे भाव जाणून घ्या..
सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ८०० रूपयांनी स्वस्त, वाचा ताजे दर
Gold Rate Today NewsSaam Tv
Published On

संजय महाजान, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

वर्षभर सोनं खरेदी करू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलं. याचा थेट परिणाम सराफा बाजारावर झाल्याचे दिसतेय. कारण, सोमवारी सकाळी जळगावातील सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसऱण नोंदवण्यात आली. महाराष्ट्रातील सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात सोन्याच्या दरात प्रतितोळा ८०० रूपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. तर चांदीच्या दरातही प्रति किलो १ हजार रूपयांची कपात झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दारात आठशे रुपयांनी तर चांदीच्या दरात हजार रुपयांनी घसरण झाली आहे. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर भविष्यात सोन्याची स्थिती कशी राहील, याकडे ग्राहकांचं लक्ष लागलेय. जळगावच्या सुवर्णनगरीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १ लाख ५० हजार रूपये इतकी झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर १ लाख ३७ हजार ४०० रूपये इतके झाले आहेत. तर चांदीची किंमत प्रति किलो २ लाख ५९ हजार इतक्या रूपयांवर आली आहे. भविष्यात सोन्याची किंमत वाढणार की घसऱणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ८०० रूपयांनी स्वस्त, वाचा ताजे दर
Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सराफ व्यावसायिक पुन्हा संकटात

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि गगनाला भिडलेले सोन्याचे दर यामुळे आधीच ग्राहक सोन्याकडे पाठ फिरवत होते. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केल्याने पुण्याच्या राजगुरुनगरमधील सराफ बाजारात मोठा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र लग्नसराई आणि जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू आहे, तरीही दागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी नाहीये. मोदींच्या या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असला तरी, याचा थेट फटका सराफ व्यावसायिकांना बसला आहे. आधीच नोटबंदी आणि लॉकडाऊनचा मोठा तोटा सहन केलेल्या या व्यावसायिकांसमोर आता बँकेचे कर्ज आणि कामगारांचे पगार कसे द्यायचे, हे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यावर सरकारने काहीतरी विचार करावा, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.

सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ८०० रूपयांनी स्वस्त, वाचा ताजे दर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो..₹१५०० बंद झाले का? योजनेत तुमचं नाव आहे का? एका क्लिकवर असं तपासा स्टेट्स

पुण्यात सोन्याचे दर काय आहेत?

पुण्यातील सराफा बाजारातही आज सोन्याच्या दरात कपात झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १५०५०० रूपये इतकी झाली आहे. तर २२ कॅरेट सोनं प्रतितोळा १३९००० हजार रूपयांवर आले आहे. सोमवारी सकाळी सराफा बाजार उघडातच सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. लग्नसराईमुळे दागिन्यांच्या दुकानात खरेदीचा उत्साह आहे, पण मोदींच्या आवाहानानंतर काही लोकांनी सोनं घेणं टाळले आहे.

सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ८०० रूपयांनी स्वस्त, वाचा ताजे दर
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! 'या' ६५ लाख लाडक्या बाहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार? महत्वाची अपडेट आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com