Gold Rate Today: सोनं ₹१५०० तर चांदी १० हजारांनी महागली; सुवर्णनगरीतील १ तोळ्याचे दर किती? वाचा सविस्तर

Gold Rate Today Hike: सोन्याच्या दरात आज विक्रमी वाढ झाली आहे. सोनं जवळपास १५०० रुपयांनी महागलं आहे. सोन्यानंतर चांदीचे दर प्रति किलोमागे १० हजारांनी वाढले आहेत.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ

सोनं ₹१५००नी महागलं

चांदीच्या दरात १० हजारांची वाढ

रोज सोने चांदीचे नवे दर अपडेट होत असतात. आज सोने-चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.पीएम मोदींना सोने खरेदी करु नका, असं आवाहन केले होते. त्यानंतर काल सोन्याचे दर घसरले होते. आज जळगावातील सराफा बाजारातदेखील सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.

Gold Rate Today
Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! प्रति तोळ्यामागे इतक्या रुपयांची घसरण; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे भाव

सोनं-चांदीच्या दरात विक्रमी वाढ (Gold Silver Rate Hike)

जळगावच्या सराफा बाजारपेठेत आज सोन्याचे दर १५०० ने तर चांदीची १० हजार रुपयांनी वाढले आहेत. सोने १,५६ लाख रुपये चांदी २,७९ लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीन शांतता प्रस्ताव फेटाळून लावल्याने सोने-चांदीच्या दराने उसळी घेतली. जळगावच्या सराफा बाजारात १,५५, २२१ रुपये तोळा असलेले सोने १५०० रुपयांनी वाढून १,५६ वर पोहोचले तर चांदी १० हजारांनी ने वाढून २,७९, वर पोहोचली.

सोनं १ लाख ५१ हजार ५०० रुपये आहे. जीएसटीसह हे दर १ लाख ५६ हजारांवर गेले आहेत. चांदी जीएसटीसह २ लाख ७९ हजारांवर पोहचली आहे. सोन्याच्या दरात 1500 रुपयांनी वाढ झाली तर चांदीच्या दरात किलोमागे 10 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

Gold Rate Today
Gold Rate : ऐन लग्नसराईत ग्राहकांची चिंता वाढली! सोनं-चांदीचे दर गगनाला भिडले, आठवडाभरात असा होता बाजार भाव

व्यावसायिकांचे टेन्शन वाढलं

एकीकडे सोन्याच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे तर दुसरीकडे पीएम मोदींनी केलेल्या आवाहनानंतर सोन्याच्या व्यापारांचेदेखील टेन्शन वाढले आहे. सध्या ऐन लग्नसराईत सोनं खरेदी करण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. दागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी नाहीये. त्यामुळे सराफ व्यावसायिकांना फटका बसला आहे. दरम्यान, जर सोने खरेदी केले नाही तर कामगारांचे पैसे कसे देणार, असाही प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.

Gold Rate Today
Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर बदलले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com