

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं महागलं
सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे इतक्या रुपयांनी वाढले
आजचे सोन्याचे दर किती?
सोने चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी पीएम मोदींनी वर्षभर सोने खरेदी करु नका, असे आवाहन केले होते. त्यानंतर काल सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. प्रति तोळ्यामागे सोन्याचे दर ८०० रुपयांनी घसरले होते.मात्र, आज याउलट होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ५४० रुपयांनी वाढ झाली आहे.
पीएम मोदींनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वर्षभर सोने-चांदी खरेदी करु नका. यानंतर मात्र, सोन्याच्या व्यापाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान, सोन्याचे दर अजून घसरतील अशी अपेक्षा होती. मात्र, आज सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. आजचे सोने-चांदीचे दर वाचा.
आजचे सोन्याचे दर किती? (Gold Rate Today Price Hike)
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५४० रुपयांची महागले आहेत. हे दर १,५३,९८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं ४३२ रुपयांनी महागलं असून हे दर १,२३,१८४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ५४०० रुपयांनी महागलं असून हे दर १५,३९,८०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)
२२ कॅरेट सोन्याचे दर ५०० रुपयांनी महागले आहेत. हे दर १,४१,१५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४०० रुपयांनी महागले असून हे दर १,१२,९२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ५००० रुपयांनी महागलं असून हे दर १४,११,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate)
१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४१० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१५,४९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं ३२८ रुपयांनी महागलं असून हे दर ९२,३९२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ४,१०० रुपयांनी वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.