

देशात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात आहे, सण-उत्सवांची रेलचेल आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या या आवाहनाने संपूर्ण देशात खळबळ उडालीय. पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले ऐका...
ऐकलतं, पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर त्याचा थेट परिणाम आता शेअर मार्केटमध्ये झाला...सोने दागिन्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली...
मोदींचं आवाहन, सोनं कंपन्यांना फटका
कंपनी घसरण
Sky Gold & Diamonds शेअर्स 12.2 टक्क्यांनी घसरले
Senco Gold चे शेअर्सही 10.7 टक्क्यांनी घसरले.
Kalyan Jewellers Indiaचे शेअर्स 8.3% नी घसरले.
Titan कंपनीचे शेअर्स 6.4% नी घसरले.
PNG ज्वेलर्सचे शेअर्स 8% नी आणि PC ज्वेलर्सचे शेअर्स 5% नी घसरले
भारत मोठ्या प्रमाणात सोनं आयात करतो. ज्यासाठी भारताला डॉलर्स मोजावे लागतात.. त्यामुळे देशाच्या तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी ,अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी मोदींनी जनतेला हे आवाहन केलयं...मात्र सोन्याची खरेदी पूर्णपणे थांबल्यास 1 कोटी लोकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळेल, अशी भीती ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमिस्टक कौन्सिलच्या अध्यक्षांनी व्यक्त केलीय..
दरम्यान मुंबईच्या प्रसिद्ध सराफा बाजारात ही चिंतेचं वातावरण पसरलयं. ग्राहक आले नाहीत तर कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे आणि आमचे पोट कसे भरणार?" असा सवाल छोट्या व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय....
तर दुसरीकडे लग्नात सोनं हा कळीचा मुद्दा आहे. लग्नात सोन्याची मोठ्या प्रमाणावर देवाण-घेवाण होत असते. सोनंच दिलं नाही तर लग्न मोडतील असा संताप सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलाय.
भारतीय संस्कृतीत सोनं ही केवळ गुंतवणूक नाही, तर स्त्रीधन आणि आपत्तीत कामाला येणारी 'हक्काची गुंतवणूक ' आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे आवाहन 'राष्ट्रहितासाठी' असले तरी, प्रत्यक्षात मात्र सामान्यांसाठी मोठं संकट यामुळे उभं राहू शकत. छोट्या साराफा व्यापाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार तर अनेक घरांमधील लग्न समारंभही संकटात येण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.