Manasvi Choudhary
आजकाल चांदीची ज्वेलरी घालण्याचा ट्रेंड सुरू आहे. जिन्स-टॉप, साडी लूकवर मुली व महिला चांदीची ज्वेलरी घालतात. एथनिक व वेस्टर्न अश्या दोन्ही लूकवर चांदीची ज्वेलरी उठून दिसते. चांदीच्या ज्वेलरीचे अनेक नवनवीन प्रकार आहेत.
मात्र चांदीची ज्वेलरी काळी पडते. ज्वेलरी काळी पडण्यामागचे नेमके कारण काय आहे? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
चांदी हा एक मौल्यवान धातू आहे. त्याचा वापर दागिने, भांडी आणि सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो.
मात्र तुम्हाला माहितीये का? हवेच्या संपर्कात आल्यावर चांदी काळी पडते. चांदी काळी पडणे ही सामान्य प्रक्रिया आहे.
यामागचे कारण म्हणजे चांदी हवेत असलेला हायड्रेजन सल्फाईड या वायूच्या संपर्कात आल्याने काळी पडते. चांदीवर सिल्वर सल्फाईडचा थर जमा होतो हा थर काळपट रंगाचा असतो ज्यामुळे चांदीची चकाकी जाते.
चांदीचे दागिने हे सतत वापरत असाल तर , शरीरातील घाम आणि हवेतील ओलावा यामुळे काळी पडतात.
चांदीची भांडी व दागिने काळी पडू नये म्हणून योग्य काळजी घ्या चांदीची भांडी स्वच्छ धुतल्यानंतर कोरडी पुसून ठेवावी.
चांदीचे दागिने वापरल्यानंतर तसेच न ठेवता झिपलॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट डब्यात ठेवावे यामुळे ते लवकर काळे पडत नाही.