Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर

PETROL DIESEL PRICE HIKE ALERT: पेट्रोल -डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे.
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर
PETROL DIESEL PRICE HIKE ALERT: Saam Tv
Published On
  1. अमेरिका-इराण तणावामुळे ब्रेंट क्रूडच्या दरात वाढ

  2. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर किमतीत मोठा बदल

  3. ७७ डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचले दर

  4. कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणला धमकी दिली. त्यांच्या धमकीनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाला. कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर ७७ डॉलरच्या वर गेले आहे. याचा परिणाम म्हणजे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. पेट्रोल २.६१ रुपये आणि डिझेल २.७१ रुपये ऐवढी शेवटची दरवाढ झाली होती. वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे कर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करांमुळे त्यांच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळतो. आज देशातल प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत ते आपण पाहणार आहोत...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर
Petrol Diesel Rate Today (10 December) : मुंबई-पुण्यासह नागपूरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर? महाराष्ट्रात आजचा भाव किती?

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर झाले आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची १११.२१ रुपये आणि डिझेल ९७.८३ रुपयांना विकले जात आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल ११३.४७ रुपयांना आणि डिझेल ९९.८२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी १०७.८७ रुपये आणि डिझेलसाठी ९९.६६ रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहे.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर
Petrol Diesel Price Today: 'या' शहरात पेट्रोल ₹८८.६६ तर डिझेल ८४.५६ रुपये; सरकारी कंपन्यांनी दर घटवले का?

बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर १११.६८ रुपये आणि डिझेलचा दर ₹९९.५६ प्रति लिटर आहे. भुवनेश्वरमध्ये पेट्रोलचा दर १०८.९७ रुपये आणि डिझेलचा दर १००.६८ रुपये आहे. चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर १०१.५४ रुपये आणि डिझेलचा दर ८९.४७ रुपये आहे. हैदराबादमध्ये पेट्रोलचा दर ११५.६९ रुपये आणि डिझेलचा दर १०३.८२ रुपये इतका आहे. जयपूरमध्ये पेट्रोलचा दर ११३.१९ रुपये आणि डिझेलचा दर ९८.२५ रुपये आहे.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

दरम्यान, आज कालच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव प्रति बॅलर ७७.८६ डॉलर इतका झाला आहे. काल ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव प्रति बॅलर ७६.११ डॉलर इतका होता. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे आता त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, सौदी अरेबियातून आली खुशखबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com