Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीनंतर सरकारी कंपन्यांचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; १ लिटरसाठी किती मोजावे लागणार?

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा मोठा बदल करण्यात आला आहे. नायरा एनर्जीने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी नवे दर जारी केले.
Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीनंतर सरकारी कंपन्यांचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; १ लिटरसाठी किती मोजावे लागणार?
PETROL, DIESEL google
Published On
  • नायरा एनर्जीने पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये प्रति लिटर स्वस्त केले

  • नवीन दर १ जुलैपासून लागू झाले आहेत

  • त्यानंतर आज सरकारी तेल कंपन्यांनीही पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले

  • सर्वसामान्य ग्राहकांना इंधन दरात दिलासा मिळाला

खासगी तेल विपणन कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात केली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. कंपनीकडून १ जुलैपासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले. या कंपनीने सर्वच्या सर्व ७००० पंपावर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेलच्या दरामध्ये ३ रुपयांची कपात केली. नायरा कंपनीने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

आज २ जुलै रोजी सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या आयओसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. पण ग्राहक अजूनही निराश आहेत. कच्च्या तेलाच्या किमती $७१ च्या खाली घसरल्या असतानाही पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. प्रति लिटर ५ रुपयांची दरकपात होऊनही बंगळुरूमधील नायरा पंपांवर पेट्रोल अजूनही १११.२० रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९८.८० रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीनंतर सरकारी कंपन्यांचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; १ लिटरसाठी किती मोजावे लागणार?
Petrol-Diesel: सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! पेट्रोल-डिझेलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ जुलैपासून होणार लागू

दरम्यान, इंडियन ऑइलच्या पंपांवर आज २ जुलै रोजी डिझेल ९८.८० रुपये प्रति लिटर आणि पेट्रोल ११०.९१ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. सरकारी कंपन्यांनी कोणतीही दरकपात केलेली नसतानाही ही परिस्थिती आहे. फरिदाबादमधील नायरा पंपांवर पेट्रोल १०३ रुपये आणि डिझेल ९८.८४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात होते. महाराष्ट्रातील नायरा पंपांवर आता पेट्रोल १११.६६ रुपये आणि डिझेल ९७.९९ रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. या ठिकाणी नायराच्या इंधनाच्या किमती सरकारी कंपन्यांच्या किमतींपेक्षा कमी किंवा जवळपास आहेत.

Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीनंतर सरकारी कंपन्यांचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; १ लिटरसाठी किती मोजावे लागणार?
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

ज्यावेळी आखाती देशांणध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. नायराने सर्वप्रथम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १५ आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर मे महिन्यात, सरकारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरात प्रति लिटर ७.५० रुपयांनी वाढ केली. आता १ जुलै रोजी नायराने आपली वाढवलेल्या दरवाढीमध्ये कपात केली.

आज सरकारी पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत?

जयपूरः पेट्रोल ११२.६६ रुपये आणि डिझेल ९७.७८ रुपये प्रति लिटर

दिल्ली: पेट्रोल १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर

कोलकाता: पेट्रोल ११३.५१ रुपये आणि डिझेल ९९.८२ रुपये प्रति लिटर

मुंबई: पेट्रोल १११.२१ रुपये आणि डिझेल ९७.८३ रुपये प्रति लिटर

चेन्नई: पेट्रोल १०७.७७ रुपये आणि डिझेल ९९.५५ रुपये प्रति लिटर

Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीनंतर सरकारी कंपन्यांचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; १ लिटरसाठी किती मोजावे लागणार?
Petrol Price India: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल- डिझेल झालं स्वस्त; १ लिटरसाठी किती पैसे मोजावे लागणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com