Petrol Price India: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल- डिझेल झालं स्वस्त; १ लिटरसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Fuel Rate Update: नायरा एनर्जीने १ जुलैपासून देशभरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये प्रति लिटरने स्वस्त केले आहे. कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून नवीन दर, कारणे आणि सरकारी कंपन्यांची भूमिका जाणून घ्या.
Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, LPG अन् पेट्रोल-डिझेलबाबत सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
petrol diesel price Saam Tv
Published On

देशातील सर्वात मोठ्या खासगी इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या नायरा एनर्जीने लोकांना मोठा दिलासा दिलाय. कंपनीने १ जुलैपासून देशभरातील आपल्या सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. नव्या दरांनुसार पेट्रोल ५ रुपये प्रति लिटरने तर डिझेल ३ रुपये प्रति लिटरने स्वस्त करण्यात झालं.

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, LPG अन् पेट्रोल-डिझेलबाबत सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नायरा एनर्जीने इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. पश्चिम आशियातील संघर्षाच्या काळात कच्च्या तेलाचा दर १२५ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला होता. मात्र आता परिस्थिती सुधारल्यामुळे कच्च्या तेलाचा भाव ७० ते ७२ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आला आहे.

नायरा पेट्रोल पंपांवर आता पेट्रोल-डिझेल किती रुपयांना मिळणार?

दिल्ली-एनसीआर परिसरातील हरियाणातील फरीदाबादमध्ये नायरा एनर्जीच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोलच्या दरात थेट ५ रुपयांची कपात झालीये. याआधी पेट्रोलचा दर १०८.०३ रुपये प्रति लिटर होता. तो आता १०३.०३ रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याचप्रमाणे डिझेलचा दर ९८.८४ रुपयांवरून ९५.८४ रुपये प्रति लिटर इतका कमी करण्यात आला आहे

स्ट्रेट ऑफ होर्मुज पुन्हा सुरू झाल्याचा परिणाम

पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुज या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून पुन्हा एकदा कच्चे तेल आणि LNG यांचा पुरवठा सुरळीत सुरू झालाय. यामुळे पुरवठा खंडित होण्याची भीती कमी झाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालीये.

देशभरात ७ हजारांहून अधिक पेट्रोल पंप

माहितीनुसार, नायरा एनर्जीद्वारे देशभरात एकूण ७ हजारांपेक्षा जास्त पेट्रोल पंप चालवले जातात. कंपनीने केलेली ही दरकपात सर्व पेट्रोल पंपांवर १ जुलैपासून लागू करण्यात आलीये. परंतु प्रत्येक राज्यातील व्हॅट (VAT) आणि इतर स्थानिक कर वेगवेगळे असल्यामुळे प्रत्यक्षात पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्याप्रमाणे बदलू शकतात.

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, LPG अन् पेट्रोल-डिझेलबाबत सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
पेट्रोल आणि डिझेलबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; ग्राहकांवर काय होणार परिणाम?

सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप दर कमी केले नाहीत

कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरूनही सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही. देशातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या तीन सरकारी कंपन्या मिळून देशभरात ९० हजारांहून अधिक पेट्रोल पंप चालवतात. भारतात एकूण १ लाखांपेक्षा जास्त पेट्रोल पंप असून त्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक पंप या तीन सरकारी कंपन्यांच्या मालकीचे आहेत.

सध्या दिल्लीतील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर ९५.२० रुपये प्रति लिटर इतकाच कायम आहे.

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, LPG अन् पेट्रोल-डिझेलबाबत सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
LPG Cylinder Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, १८३ रुपयांनी स्वस्त झाला गॅस सिलिंडर

इंधन ७.५० रुपयांपर्यंत महागलं होतं

पश्चिम आशियातील तणाव सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम नायरा एनर्जीनेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या होत्या. त्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनीही इंधनाचे दर वाढवले होते. सरकारी कंपन्यांनी त्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकूण ७.५० रुपये प्रति लिटरपर्यंत वाढ केली होती. आता कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर नायरा एनर्जीने पुन्हा पुढाकार घेत दर कमी केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com