Petrol-Diesel: सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! पेट्रोल-डिझेलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ जुलैपासून होणार लागू

Petrol diesel rule change from 1 July in India: पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलैपासून हा निर्णय देशात लागू होणार आहे.
Petrol-Diesel: सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! पेट्रोल-डिझेलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ जुलैपासून होणार लागू
PETROL, DIESEL google
Published On
  • केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल खरेदीवरील निर्बंध हटवले

  • नवीन नियम १ जुलैपासून लागू होणार

  • व्यावसायिक खरेदीदारांना आता मर्यादेशिवाय इंधन खरेदी करता येणार

  • इंधन पुरवठा पूर्वपदावर येत असल्याने निर्णय घेण्यात आला

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका गेल्या दोन महिन्यांपासून भारतासह जगभरातील देशांना बसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. पेट्रोल-डिझेल मिळत नसल्यामुळे महागाई वाढली होती. गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या होत्या. त्यामुळे सरकारकडून प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले होते. पण आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. अशातच आता केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय १ जुलैपासून देशामध्ये लागू होणार आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी खरेदीबाबत बदल लागू केला आहे. मोठ्या व्यावसायिक खरेदीदारांना लागू केलेले इंधन खरेदीचे नियम आता केंद्र सरकारकडून हटवण्यात आले आहेत. यापूर्वी व्यवासायासाठी पेट्रोल- डिझेलची खरेदी करणाऱ्यांना पेट्रोल पंपावर इंधन खरेदी करण्यास तात्पुरते नियम लागू केले होते. या नियमाअंतर्गत एका निश्चित मर्यादेच्या पलिकडे व्यावसायिकांना पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता येत नव्हते. पण आता व्यावसायिकांना पेट्रोल-डिझेल खरेदी करताना कोणताही अडथळा येणार नाही आहे. त्यांना पेट्रोल पंपावरून कोणत्याही मर्यादेशिवाय पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला.

Petrol-Diesel: सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! पेट्रोल-डिझेलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ जुलैपासून होणार लागू
E20 Petrol: इथेनॉलमुळे पेट्रोल टँकला मुंग्या? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींवर केंद्र सरकारकडून निर्बंध लादण्यात आले होते. पण आता युद्धाची परिस्थिती हळूहळू संपत असल्यामुळे सरकारकडून देखील महत्वपूर्ण पाऊलं उचलली जात आहेत. हे युद्ध निवळत चालल्यामुळे आता इधन पुरवठा देखील पूर्वपदावर येत आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस पुरवठा सुरळीत होत असल्यामुळे आता केंद्र सरकारने देखील नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. सर्वसामान्यांना इंधन पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी केंद्र सरकारने व्यावसायिक कामासाठी लागणाऱ्या इंधनावर मर्यादा आणली होती. त्यामुळे व्यावसायिक चिंतेत आले होते. पण आता त्यांची चिंता दूर झाली आहे.petrol

Petrol-Diesel: सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! पेट्रोल-डिझेलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ जुलैपासून होणार लागू
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

दरम्यान, अमेरिका आणि इराण या देशांमधील कराराची योग्य अंमलबजावणी होत नसल्याच्या वृत्तांदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः राजनैतिक संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मंगळवारी दोहा येथे इराणसोबत बैठक होणार आहे. मात्र इराणने ही चर्चा नाकारली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल विकणाऱ्या सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. भारतात २५ मे पासून दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol-Diesel: सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! पेट्रोल-डिझेलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ जुलैपासून होणार लागू
Petrol-Diesel: सरकारकडून पेट्रोल आणि डिझेल खरेदीच्या नियमात बदल, काय आहेत नवीन नियम?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com