E20 Petrol: इथेनॉलमुळे पेट्रोल टँकला मुंग्या? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

E20 Petrol and Ants Debunked: E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे टाकीला मुंग्या लागत असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
E20 Petrol: इथेनॉलमुळे पेट्रोल टँकला मुंग्या? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
E20 PetrolSaam Tv
Published On
  • सोशल मीडियावर E20 पेट्रोलबाबत व्हिडिओ व्हायरल

  • पेट्रोल टँकला मुंग्या लागण्याचा दावा करण्यात आला

  • तज्ज्ञांच्या पडताळणीत इंधनात साखर नसल्याचे स्पष्ट

  • त्यामुळे व्हायरल दावा पूर्णपणे खोटा ठरला

E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे टाकीला मुंग्या लागल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय. इथेनॉलमध्ये साखरेचं जास्त प्रमाण असल्याने मुंग्या लागल्याचा दावा करण्यात आलाय. पण, खरंच पेट्रोलच्या टाकीला इथेनॉलमुळे मुंग्या लागल्यायत का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

हा व्हिडिओ पाहा. या व्हिडिओमध्ये पेट्रोलच्या टँकला मुंग्या लागल्याचं दिसतंय. E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे मुंग्या आकर्षित झाल्याचा दावा करण्यात आलाय. इथेनॉल बनवण्यासाठी उसाचा वापर करतात आणि यात सारखेचं प्रमाण जास्त असल्याने मुंग्या लागल्याचा दावा करण्यात आलाय. पण, खरंच E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे या मुंग्या लागल्यायत का? हा प्रश्न उपस्थित होतोय.

E20 Petrol: इथेनॉलमुळे पेट्रोल टँकला मुंग्या? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
Petrol Diesel Rate: राज्यात खासगी पंपांवर पेट्रोल-डिझेल महागलं; आता प्रति लिटर 'इतके' रुपये मोजावे लागणार

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकजण संभ्रमात आहेत. आता E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. त्यातच हा व्हिडिओ समोर आलाय.पेट्रोल टाकीच्या झाकणाभोवती शेकडो मुंग्या फिरताना या व्हिडीओमध्ये दिसतंय. काहींनी तर इथेनॉल हे ऊसापासून तयार होत असल्याने त्यामध्ये साखरेचे अंश राहतात आणि त्यामुळे मुंग्या येतात, असा दावा केला. मात्र या दाव्यामागचे सत्य काय आहे? याची पडताळणी आम्ही तज्ज्ञांकडून केली.

E20 Petrol: इथेनॉलमुळे पेट्रोल टँकला मुंग्या? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
Petrol-Diesel Rate : पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी चेक करा नवीन दर; जाणून घ्या प्रमुख शहरांतील किमती

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात. भारतामध्ये सध्या E20 पेट्रोलचा वापर वाढतोय. E20 म्हणजे 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉलचे मिश्रण आहे. इथेनॉल ऊस, मका आणि इतर जैविक स्रोतांपासून तयार करतात. उत्पादन प्रक्रियेनंतर इंधनात साखरेचे अंश शिल्लक राहत नाहीत. पेट्रोलमध्ये साखर असल्यामुळे मुंग्या लागतात हा दावा चुकीचा आहे.

E20 Petrol: इथेनॉलमुळे पेट्रोल टँकला मुंग्या? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

व्हायरल व्हिडिओमध्ये पेट्रोल टाकीजवळ मुंग्या दिसत असल्या, तरी त्याचा थेट संबंध E20 पेट्रोलमधील साखरेशी जोडणे चुकीचे आहे. सध्या उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांनुसार मुंग्या इंधन खाण्यासाठी पेट्रोल टाकीकडे येतात, असे कोणतेही निष्कर्ष समोर आलेले नाहीत. त्यामुळे आमच्या पडताळणीत E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये साखर असल्यामुळे मुंग्या आकर्षित होतात, हा दावा असत्य ठरलाय.

E20 Petrol: इथेनॉलमुळे पेट्रोल टँकला मुंग्या? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डीझेलच्या दरात मोठी कपात; सरकारने आकडेवारी सांगत समजावलं 'किमतींचं गणित'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com