

भारतात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार
सौदी अरेबियाने कच्च्या तेलाचे दर कमी केले
पेट्रोल डिझेल दर कमी होण्याची शक्यता
क्रूड ऑइल दर घसरल्याचा भारतावर परिणाम
पेट्रोल-डिझेलबाबत एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार आहे. जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार कंपनी सौदी अमारकोने भारतासह आशियाई ग्राहकांना होणाऱ्या पुरवठ्यासाठी आपल्या कच्च्या तेलाच्या किमिती ऑगस्टमध्ये विक्रमी नीचांकी पातळीवर आणल्या आहेत.
कंपनीच्या या निर्णयाचा फायदा भारताला होणार असून भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. कंपनीने आपल्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या अरेब लाईट या कच्च्या तेलाची किंमत प्रादेशिक ओमान/दुबई मानकापेक्षा प्रति बॅलर १.५० डॉलरने कमी ठेवली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेमध्ये ही प्रति बॅलर ११ डॉटरची विक्रमी कपात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २००३ पासूनची ही आतापर्यंतची सर्वा मोठी कपात मानली जात आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी केल्यामुळे ओएसपी जून २०२० नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहचली आहे. जेव्हा जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा अतिरिक्त साठा झाला होता आणि कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे मागणी घटल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती अनेक दशकांतील निचांकी पातळीवर घसल्या होत्या.
सौदी अरेबियातील कच्च्या तेलाच्या कमी झाल्यामुळे भारतासारख्या प्रमुख आयातदारांसाठी कच्चे तेल खरेदी करण्याचा खर्च कमी होऊ शकतो. खरेदी खर्च कमी झाल्यामुळे परिणामी पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल.कच्च्या तेलाच्या प्रति बॅरल किमतीत १० डॉलरची वाढ झाल्यास भारतीय तेल विपणन कंपन्यांना प्रति लिटर अंदाजे ६ रुपयांचा तोटा होतो. अशा परिस्थितीमध्ये सौदी अरेबियाने घेतलेला निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरत आहे.
जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ कमी झाल्यास भविष्यात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किंमतींवरील दबाव कमी होऊ शकतो. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नुकताच असे संकिते दिले की, जर कच्च्या तेलाच्या किमती युद्धपूर्व पातळीवर राहिल्या तर पेट्रोल भारतात पेट्रोल- डिझेलच्या किमती कमी होऊ शकातात. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमती कंपनीकडून कमी करण्यात आल्या. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की अमेरिका-इराण युद्धविरामामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.