दिल्ली- मुंबई एक्सपेसवेवर भीषण अपघात; बस-ट्रकची जोरदार धडक, स्लीपर बसनं घेतला पेट, ८ जणांचा मृत्यू

Sleeper Bus And Truck Accident : राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर एका स्लीपर बस आणि ट्रकचा अपघात झाला. धडक होताच बसने पेट घेतला. यात किमान आठ जण ठार झाले आणि २४ हून अधिक जण जखमी झाले.
Sleeper Bus And  Truck Accident
Delhi Mumbai Expressway bus truck collision latest newssaam tv
Published On
Summary
  • दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर हा भीषण अपघात घडला.

  • बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रिकाम्या ट्रकवर जाऊन धडकली.

  • अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला

दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की बसने थेट पेट घेतला. बसने पेट घेतल्यामुळे ८ जणांचा यात होरपळून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात घडला. अपघातग्रस्त बस हरिद्वारहुन इंदूरच्या दिशेने जात होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस मुंबईकडे जाणाऱ्या रिकाम्या ट्रकला धडकली. ट्रक आणि स्लीपर बसची धडक होताच बसने पेट घेतला. या अपघातग्रस्त बसमध्ये जवळपास ३० हून अधिक प्रवासी होते. यातील आठ जणांचा आगीमुळे होरपळून मृत्यू झाला असून २४ हून अधिक जण गंभीर जखमी झालेत.

Sleeper Bus And  Truck Accident
Road accident news: पहाटे अपघाताचा थरार! भरधाव बसची कारला धडक, एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात घडला. अपघातग्रस्त बस हरिद्वारहुन इंदूरच्या दिशेने जात होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस मुंबईकडे जाणाऱ्या रिकाम्या ट्रकला धडकली. ट्रक आणि स्लीपर बसची धडक होताच बसने पेट घेतला. या अपघातग्रस्त बसमध्ये जवळपास ३० हून अधिक प्रवासी होते. यातील आठ जणांचा आगीमुळे होरपळून मृत्यू झाला असून २४ हून अधिक जण गंभीर जखमी झालेत.

Sleeper Bus And  Truck Accident
Accident News : महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसची ट्रेलरला धडक; ४ जणांचा मृत्यू

रूग्णांना तातडीने दौसा येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून काही रूग्णांची परिस्थीती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच आतिरिक्त पोलिस अधीक्षक योगेंद्र फौजदार, उपपोलिस अधीकक्षत धर्मेंद्र कुमार आणि ए्सडीएस संजू मीणा यांनी जखमींची भेट घेतली असून उपचारांच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com