Accident News : महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसची ट्रेलरला धडक; ४ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Yamuna Accident News : उत्तर प्रदेशात खासगी बसची खडीने भरलेल्या ट्रेलरला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
YAMUNA EXPRESSWAY ACCIDENT: 4 DEAD, 25 INJURED AFTER LUCKNOW-DELHI BUS HITS TRAILER IN UTTAR PRADESH
YAMUNA EXPRESSWAY ACCIDENT: 4 DEAD, 25 INJURED AFTER LUCKNOW-DELHI BUS HITS TRAILER IN UTTAR PRADESHSaam tv
Published On
Summary
  • यमुना द्रुतगती मार्गावर खासगी बस आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात

  • दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू, तर २५ हून अधिक प्रवासी जखमी

  • जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू

  • पोलीस अपघाताच्या कारणांचा पुढील तपास सुरु

उत्तरप्रदेशच्या यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे २५ प्रवासी जखमी झाले आहेत. राया परिसरातील १११ व्या मैलखुणेजवळ हा अपघात घडला. लखनौहून दिल्लीकडे जाणाऱ्या खासगी बसने खडीने भरलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिल्याने हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महावनचे पोलीस अधीक्षक संजीव कुमार यांनी सांगितले की, सोमवारी रात्री सुमारे साडेतीनच्या सुमारास खासगी बस प्रवाशांना घेऊन लखनौहून दिल्लीकडे जात होती. त्याचवेळी खडीने भरलेला ट्रेलर द्रुतगती मार्गाच्या तिसऱ्या लेनमधून पुढे जात होता. भरधाव वेगात असलेल्या बसने ट्रेलरला मागून धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

YAMUNA EXPRESSWAY ACCIDENT: 4 DEAD, 25 INJURED AFTER LUCKNOW-DELHI BUS HITS TRAILER IN UTTAR PRADESH
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, द्रुतगती मार्गावरील कर्मचारी आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचल. बचावकार्य सुरू करून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

YAMUNA EXPRESSWAY ACCIDENT: 4 DEAD, 25 INJURED AFTER LUCKNOW-DELHI BUS HITS TRAILER IN UTTAR PRADESH
Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे काही काळ द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com