
मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती आयुष्यात खूप यश मिळवतो. यश मिळवण्यासाठी फक्त अभ्यास आणि सातत्य असणे गरजेचे आहे. असंच सातत्य गुजरातच्या कार्तिक जीवाणी यांनी ठेवलं. कार्तिक जिवाणी या देशातील सर्वात अवघड तीन परीक्षा पास केल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. (Success Story)
कार्तिक जिवाणी हे मूळचे गुजरातचे रहिवासी. त्यांनी सरकारी नोकरीसाठी ३ वेळा यूपीएससी परीक्षा दिली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.
कार्तिक जीवाणी यांना पहिल्या दोन प्रयत्नात अपयश मिळाले. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली आणि ती क्रॅक केलीच. कार्तिक यांनी ८ वी पर्यंतचे शिक्षण गुजराती भाषेत केले. त्यानंतर इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १२वीनंतर जेईई परीक्षा क्रॅक केली. त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनियरिंग पूर्ण केले. (Success Story Of IPS)
कार्तिक जीवाणी यांनी इंजिनियरिंग करत असतानाच स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्ण घेतला. त्यांनी २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले. २०१८ मध्ये त्यांना ९४ रँक मिळाली. त्यानंतर २०१९ मध्ये ८४ रँक मिळाली.
आयएएस होण्याआधी त्यांनी आयपीएस पोस्टिंग मिळाली होती. त्यावेळी त्यांनी ट्रेनिंग करत असताना सुट्टी घेऊन यूपीएससी परीक्षा दिली त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले.कार्तिक यांनी २०२० मध्ये चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. यावेळी त्यांनी दिवसरात्र अभ्यास केला. त्यांनी स्वतः इंटरनेटवरुन विविध विषयांचा अभ्यास केला.स्वतः चे नोट्स स्वतः तयार केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.