Success Story: एकेकाळी वडापाव विकले, स्टुडिओ साफ केला, आता बनवला ५०० कोटींचा चित्रपट ;'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of Chhaava Director Laxman Utekar: छावा चित्रपट हा सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष केला होता.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त छावा या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाने फार कमी कालावधीत कोट्यवधींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाने ५०० कोटींच्या कमाईचा आकडा देखील पार केला आहे. या चित्रपटासाठी अनेकांनी मेहनत घेतली. पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांना साकारण्यासाठी पडद्यामागे अनेक लोकांची मेहनत आहे. यामधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर. लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटासाठी खूप मेहनत केली. (Success Story Of Laxman Utekar)

Success Story
Success Story: अमेरिकेत शिक्षणासाठी गेली अन् सातासमुद्रापार सुरु केली ७५ हजार कोटींची कंपनी;पुण्याच्या नेहा नारखेडे यांचा प्रेरणादायी प्रवास

लक्ष्मण उतेकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्यांचा इंडस्ट्रीशी काहीच संबंध नव्हता. त्यांना सिनेमाचे नेहमीच आकर्षण होते. त्यामुळे ते मुंबईला आले.सुरुवातीच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला.त्यानंतर त्यांनी अनेक फिल्म स्टुडिओमध्ये वेगवेगळी नोकरी करायचे. त्यांनी साफसफाईचेदेखील काम केले होते. याच काळात ते स्टुडिओत बसून सिनेमॅटोग्राफी बघायचे. त्यातूनच त्यांनी अनेक गोष्टी शिकायचे. (Success Story Of Chhaava Director Laxman Utekar)

लक्ष्मण उतेकर यांना लुका छुपी, मिमी या चित्रपटामुळे ओळख मिळाला. परंतु छावा या चित्रपटाने त्यांना वेगळीच उंची मिळवून दिली. त्यांच्या या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

लक्ष्मण उतेकर यांनी पहिल्या काळात खूप अडचणींचा सामना केला. त्यांनी सुरुवातीच्या काळात अक्षरशः वडापावदेखील विकले आहेत. स्वतः चा दिवसाचा खर्च भागवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली.परंतु ते या सर्व प्रवासात अनेक गोष्टी शिकले.

Success Story
Success Story: १,२,३ नव्हे ३५ वेळा फेल झाला, पण जिद्द सोडली नाही, UPSC क्रॅक केलीच; IAS विजय वर्धन यांचा प्रवास

फिल्म स्टुडिओमध्ये वेगवेगळी कामे करताना त्यांनी मोठ्या लोकांना आपल्यासमोर काम करताना बघितले. त्यांच्यासोबत राहून शिकले. या सगळ्याचा त्यांना भविष्यात खूप फायदा झाला. त्यांनी आज ५०० कोटींचा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाने त्यांना वेगळीच ओळख मिळवून दिली आहे.

Success Story
Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, ४८ लाखांच्या पगाराची नोकरी सोडली; दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS अंजली विश्वकर्मा यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com