IPS Vishwas Nangare Patil: 'प्रभु शंभूराजे, शतशः नमन....'; 'छावा'साठी आयपीएस विश्वास नांगरे पाटीलांची भावनिक पोस्ट व्हायरल

IPS Vishwas Nangare Patil On Chhaava : आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी छावा हा चित्रपट पहिल्यांनंतर एक भावनिक आणि महत्वपूर्ण पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
IPS Vishwas Nangare Patil On Chhaava
IPS Vishwas Nangare Patil On ChhaavaSaam Tv
Published On

IPS Vishwas Nangare Patil On Chhaava : छावा चित्रपटाची महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात क्रेझ पाहायला मिळत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर रश्मीने मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहताना महाराजांना होणाऱ्या यातना पाहून प्रेक्षकांच्या आपसूक डोळ्यातून पाणी येत. आता आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी हा चित्रपट पहिल्यांनंतर एक भावनिक आणि महत्वपूर्ण पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

छावा चित्रपटाचा पोस्टर शेअर करून त्याखाली कॅप्शनमध्ये नांगरेंनी लिहिले, ज़िंदा रहे….. काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात,त्यांची जीभ खेचून काढली जाते. सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते! ‘मन के जीते जीत, मन के हारे हार , हार गये जो बिनलढे,उनपर हैं धिक्कार !’ केवढी उमेद केवढी प्रेरणा देणारे हे शब्द ! स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात.

IPS Vishwas Nangare Patil On Chhaava
The Diplomat Release Date: जॉन अब्राहमच्या चित्रपटाची तारिख बदलली; आता 'द डिप्लोमॅट' या दिवशी होणार प्रदर्शित

पुढे पाटील लिहितात, ‘हाथी घोडे, तोफ तलवारे फौज तो ‘तेरी सारी हैं पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा अब भी सब पे भारी हैं ! छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे, मराठी माणसाच्या स्वभिमानाचे , स्फुल्लिंगाच प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ, प्रताप, पुरंदर स्वरूप आहे. असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूप होणे नाही.

IPS Vishwas Nangare Patil On Chhaava
The Diplomat Release Date: जॉन अब्राहमच्या चित्रपटाची तारिख बदलली; आता 'द डिप्लोमॅट' या दिवशी होणार प्रदर्शित

प्रभु शंभूराजे, शतशः नमन तुम्हाला ! काय घ्यावं आम्ही मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून ? आम्ही घ्यावा निर्भयपणा, आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी, विचारांची आणि कृतींची आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुस्मटलेलं जगणं, घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द, करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म ! समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा ! राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी, शेर शिवराज आणि त्यांचा छावा ! जगदंब जगदंब ! असे लिहून विश्वास नांगरे पाटीलयां नी 'शंभू महाराजांना आदरांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com