

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका अनपेक्षित निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत अचानक खळबळ उडाली. त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. मुंबईतील शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) तब्बल १७०० अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या 'निफ्टी'मध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. या एकाच झटक्यात भारतीय गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले. इराणसोबतच्या चर्चेचा टप्पा आता संपला असून पुढील वाटाघाटींना काही अर्थ उरलेला नाही, असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्यानंतर भारतासह जगभरातील शेअर बाजारात पुन्हा पडझड सुरू झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर आखाती देशातील युद्धाचे ढग पुन्हा एकदा गडद झाले. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेसह भारतीय शेअर बाजाराला आज मोठा धक्का बसला आहे. BSE सेन्सेक्स १७०० अंकांनी कोसळला. तर दुसरीकडे निफ्टी 50 निर्देशांकही ५०० अंकांनी घसरून २३८५२ अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला असून तब्बल ८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालेय.
होर्मुझ सामुद्रधुनीत इराणने ३ जहाजांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर परिस्थिती चिघळली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला स्पष्ट शब्दात इशारा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा शांतता करार आता संपुष्टात आला असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil) ६ टक्क्यांनी वाढल्या. भारत आपल्या तेल बाहेरून आयात करतो, त्यामुळे तेलाचे भाव वाढताच शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक पटापट काढून घेण्यास सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणून बँकिंग, ऑटो आणि ऑइल-गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली.
रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर
या पडझडीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स थेट ७६,५०० च्या पातळीवर खाली आला, तर निफ्टीमध्येही ५०० हून अधिक अंकांची मोठी घसरण झाली. या एकाच दिवसातील घसरणीमुळे भारतीय गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये काही तासांतच धडाम झाले. दुसरीकडे, जागतिक तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाला. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमालीचा कमकुवत झाला आहे. रुपया ५९ पैशांनी घसरून ९५.५६ या ऐतिहासिक नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.