Gold Price Today: सोनं 6,662 रुपयांनी आणि चांदी 22,314 रुपयांनी स्वस्त; ही घसरण किती दिवस राहणार?

Silver Price Today : सोन्याच्या किंमतीत 6,662 रुपयांची तर चांदीच्या किंमतीत 22,314 रुपयांची घसरण झाली आहे. डॉलरची मजबुती आणि व्याजदरवाढीच्या शक्यतेमुळे पुढच्या काळातही बाजारावर दबाव राहू शकतो.
gold price today
gold price todaygoogle
Published On

गेल्या काही आठवड्यांपासून सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत होती. मागच्या आठवड्यात याच्या किंमतींमध्ये मोठी घट नोंदवली होती. सोनं तब्बल ६६६२ रुपयांनी स्वस्त झालं होतं, तर चांदीच्या किंमतीत २२३१४ रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांसोबत गुंतवणूकदारांचंही लक्ष या बाजाराकडे लागलेलं आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, २२ जून रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १४६६६४ रुपये होता. पण २६ जूनपर्यंत हा दर घसरला आणि १,४०,०२२ रुपयांवर आला. म्हणजेच फक्त काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत ६६६२ रुपयांची घट झाली आहे.

gold price today
8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाची मोठी अपडेट, बेसिक सॅलरीत 'इतकी' वाढ होण्याची शक्यता

चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी घसरण झाली आहे. २२ जून रोजी प्रति किलो चांदीची किंमत ही २,३७,७९९ रुपये होता. तो घसरून २,१५,४८५ रुपयांवर आला आहे. त्यामुळे चांदी तब्बल २२३१४ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सध्या २३ कॅरेट सोन्याचा दर १,३९,४६१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर १,२८,२६० रुपये, १८ कॅरेट सोन्याचा दर १,०५,०१७ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ८१,९१३ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमती घसरण्यामागे २ प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे अमेरिकन डॉलरची वाढती मजबुती. जागतिक गुंतवणूकदार जास्त परताव्याच्या अपेक्षेने सोन्याऐवजी डॉलरकडे वळत आहेत. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता. व्याजदर वाढल्याने सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी होते.

gold price today
Sunday Horoscope: सुट्टीचा दिवस खर्चात जाणार, ५ राशींच्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होणार; वाचा आजचे राशीभविष्य

तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव अजुनही ४००० डॉलर प्रति औंसच्या वर कायम आहे. त्यामुळे भविष्यातल्या घडामोंडींवर सोनं-चांदीच्या किंमतींची दिशा अवलंबून राहणार आहे. तज्ज्ञांच्या मते, कोणतीही गुंतवणूक करण्याआधी बाजारातली स्थिती कशी आहे, याचा अभ्यास करुन आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com