8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाची मोठी अपडेट, बेसिक सॅलरीत 'इतकी' वाढ होण्याची शक्यता

Central Government Employees : आठवा वेतन आयोग सक्रिय झाला असून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनवाढीच्या मागण्यांवर विचार सुरू आहे. किमान वेतन, फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्याबाबत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
8th Pay Commission salary hike
8th Pay Commission salary hikegoogle
Published On
Summary
  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

  • कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत मोठी वाढ होणार

  • फिटमेंट फॅक्टरही २.९२ ते ३.८० ठेवण्याची शक्यता

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता बेसिक सॅलरीत लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. देशातल्या ५० लाखांहून जास्त कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांची चांदी होणार आहे. केंद्र सरकारने सरकारचे आठव्या वेतन आयोग आता पूर्णपणे कामाला लागले आहे. आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक कोटीपेक्षा जास्त कुटुंबांवर थेट आर्थिक परिणाम होईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमू्र्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील आयोग सध्या अनेक राज्यांचा दौरा करत आहेत. कर्मचारी संघटना, पेन्शनधारक संघटना आणि विविध विभागांकडून सूचना व मागण्या जाणून घेत आहे. ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाइन माहिती सादर करण्याची मुदत देण्याल आलेली आहे.

8th Pay Commission salary hike
Famous Writer Actor: कलाविश्वातून वाईट बातमी! ७३ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्याचा जगाला निरोप; सिनेसृष्टीवर शोककळा

कर्मचारी संघटनांनी बेसिक सॅलरी सध्याच्या १८ हजार रुपयांवरून थेट ६९ हजार रुपये करण्याची मागणी केली आहे. काही संघटनांनी ६५ हजार रुपयांचा प्रस्ताव मांडला आहे. तर रेल्वे क्षेत्रातल्या काही संघटनांनी आर्थिक परिस्थिती आणि महागाई लक्षात घेऊन बेसिक सॅलरीही ५२,६०० रुपये ठेवण्याची शिफारस केली आहे.

तसेच सध्या फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी चर्चा सुरू आहे. कर्मचाऱ्यांची सॅलरी ही फिटमेंट फॅक्टरनुसार वाढते. तर यात २.९२ ते ३.८० ठेवण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली आहे. तसेच महागाई भत्ता वाढीचे नवीन सूत्र लागू करण्याचा प्रस्ताव असून, महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचल्यानंतर तो बेसिक सॅलरीत जमा करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

8th Pay Commission salary hike
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठवा वेतन लागू होण्याआधीच मोठी अपडेट समोर, डीए वाढीची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com