मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्षातून दोनदा पूर्व परीक्षा घेणार; खासगी क्षेत्रातही मिळेल नोकरीची संधी

MPSC Announces Major Reforms: MPSC ने महत्त्वपूर्ण सुधारणांची घोषणा केली आहे. यामध्ये संगणक-आधारित (CBT) पूर्व परीक्षा, दरवर्षी दोन पूर्व परीक्षा ३१ डिसेंबरपर्यंत निकाल आणि स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांसाठी खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MPSC Recruitment
MPSC introduces sweeping reforms with CBT-based exams, two preliminary examinations annually,Saam Tv
Published On
Summary
  • एमपीएससीच्या सर्व पूर्व परीक्षा आता सीबीटी (CBT) पद्धतीने घेतल्या जाणार.

  • वर्षातून दोन वेळा पूर्व परीक्षा आयोजित करण्याचा मोठा निर्णय.

  • सर्व परीक्षांचे निकाल त्याच वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्याचे नियोजन.

विकास मिरगणे, साम प्रतिनिधी

केरळ, तेलंगना, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू बिहार हिमाचल प्रदेश या राज्य लोकसेवा आयोगाकडून गट अ ब गट क पदांसाठी सीबीटी पद्धतीने परीक्षा घेतली जाते. त्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा सीबीटी पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

MPSC Recruitment
विद्यार्थी नागपूरचा अन् नीट परीक्षेचं केंद्र अबुधाबीत; पेपरफुटीनंतर NTAचा आणखी एक गजब कारभार

त्याचप्रमाणे वर्षातून दोनवेळा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. घेतलेल्या परीक्षांचा निकाल त्याचवर्षी ३१ डिसेंबरपर्यंत लावण्यात येणार आहे. सध्या सरकारी नोकरीमध्ये तितक्या संधी उपलब्ध नाहीत. दरवर्षी लाखोच्या संख्येने स्पर्धा परीक्षा विद्यार्थी येतात. मात्र यात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अवघे ५टक्के आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची असणारी क्षमता ही वाया जाऊ, नये याकरिता खासगी क्षेत्रात त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याबाबत महत्वपूर्ण पावूल राज्य सरकार उचलत असल्याचे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितले.

अध्यक्ष भीमनवार यांनी स्पष्ट केले की, सीबीटी पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू असेल. राज्यसेवा, गट 'अ', गट 'ब', किवा गट 'क' च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MPSC Recruitment
MPSC Student: MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; निवड न झालेल्यांनाही मिळणार संधी

सीबीटी आणि नॉर्मलायझेशन ही नवी पद्धत नसून, लोकसेवा आयोगाने आतापर्यंत सुमारे १४० परीक्षा सीबीटी प्रणाली नुसार यशस्वीपणे घेतल्या आहेत. सीबीटी प्रणाली ही वैज्ञानिक, न्यायालयाने मान्यता दिलेली आणि देशभरात स्वीकारलेली पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील विविध भरती संस्थांचा दाखला देताना त्यांनी सांगितले की, स्टाफ सिलेक्शन कमिशन दरवर्षी लाखो उमेदवारांच्या परीक्षा सीबीटी आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने घेते.

तसेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ने सुमारे १ कोटी उमेदवारांची भरती परीक्षा याच पद्धतीने यशस्वीपणे घेतली आहे. महाराष्ट्रातील स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल (सीईटी) कडूनही अलीकडे १६.३० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा सीबीटी आणि नॉर्मलायझेशनद्वारे घेण्यात आली. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्येही हीच पद्धत वापरली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. सीबीटी पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल तसेच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल, असा विश्वास अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com