विद्यार्थी नागपूरचा अन् नीट परीक्षेचं केंद्र अबुधाबीत; पेपरफुटीनंतर NTAचा आणखी एक गजब कारभार

NEET Exam : नागपूरचा विद्यार्थी असलेल्या नीट परीक्षा केंद्र अबुधाबीचं वाटप करण्यात आलं आहे. एनटीएच्या कारभारामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत सापडले आहेत.
NEET Exam news
NEET Examsaam tv
Published On
Summary

एनटीएच्या कारभाराचा सावळा गोंधळ

नागपूरच्या विद्यार्थ्याला मिळालं अबूधाबीतील परीक्षा केंद्र

एनटीएच्या कारभारामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत

पराग ढोबळे, साम टीव्ही

नीट फेरपरीक्षेपूर्वी एनटीएच्या कारभाराचा आणखी एक गोंधळ समोर आला आहे. नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबूधाबीतील परीक्षा केंद्राचे वाटप करण्यात आल्याचं समोर आलं आहे. २१ जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेसाठी परदेशातील केंद्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. एनटीएच्या परीक्षेला अवघा एक दिवस शिल्लक असताना सावळा गोंधळ उघडकीस आल्याने विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत.

NEET Exam news
NEET UG 2026 Re-Exam Admit Card: नीट फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी; परीक्षा प्रक्रियेत मोठा बदल

विद्यार्थी अब्दुल्लाहला याने याआधी नागपूरमध्येच परीक्षा केंद्र मिळाले होते. फेरपरीक्षेसाठी एनटीएने थेट यूएईमधील अबूधाबी केंद्र दिले. अर्ज करताना विद्यार्थ्याने नागपूर, वर्धा आणि भंडारा हे पर्याय निवडले होते. स्थानिक पसंतीक्रम डावलून परदेशातील केंद्र देण्यात आल्याचा आरोप आहे. नीट पेपरफुटीनंतर पारदर्शकतेचे दावे करणाऱ्या एनटीएवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

एनटीएच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. विद्यार्थ्याकडे पासपोर्ट नसल्याने परदेशात जाणे अशक्य असल्याची व्यथा पालकांनी मांडली. २४ ते ४८ तासांत पासपोर्ट आणि व्हिसा प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. एनटीएच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

NEET Exam news
मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षेत दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी; परीक्षा परिषदेने परीक्षार्थींना काय सूचना दिल्या?

या अजब कारभारानंतर पालकांनी तातडीने एनटीएच्या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यांनी तांत्रिक चूक झाल्याचे मान्य केल्याची माहिती आहे. पडताळणीनंतर सुधारित प्रवेशपत्र देण्याचे एनटीएकडून आश्वासन देण्यात आलं आहे. नवीन हॉलतिकीट मिळेपर्यंत विद्यार्थी आणि पालकांचा मानसिक तणाव कायम आहे. माजी शिक्षणमंत्री डॉ. अनीस अहमद यांनी एनटीएवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्याला तातडीने स्थानिक परीक्षा केंद्रासह सुधारित प्रवेशपत्र देण्याची मागणी केली. परीक्षेच्या व्यवस्थापनावरून एनटीए पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com