Gold-Silver Rate : २४ तासांत मार्केट जाम! सोनं ४,५०० रुपये, चांदी १३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Gold Silver Price Drop Us Iran Peace Impact: अमेरिका-इराण शांतता करारानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात सोनं ₹4,500 आणि चांदी ₹13,000 नी स्वस्त झाली असून गुंतवणूकदारांसाठी हा महत्त्वाचा काळ ठरत आहे.
Gold and silver prices fall sharply in bullion market following global economic shifts
Gold and silver prices fall sharply in bullion market following global economic shiftssaam tv
Published On

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव: अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर जागतिक बाजारात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याचा थेट परिणाम आता सोन्या-चांदीच्या दरांवर झाला असून आज मोठी घसरण जळगावच्या सराफ बाजारात झाली आहे. अमेरिका-इराण शांतता करारानंतर सोन्या चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. मात्र, आजच्या घडीला बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सोन्याच्या दरात 4 हजार 500 रुपयांची घट झाली आहे, तर चांदीच्या दरात 13 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. जळगावच्या बाजारात सध्या सोन्याच्या दर जीएसटीसह 1 लाख 49 हजार रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर 2 लाख 44 हजार रुपयांवर आहे.

Gold and silver prices fall sharply in bullion market following global economic shifts
सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

सोने चांदीचे आजचे दर

सोने 4,500 रुपये

चांदी 13,000 रुपये

सोने दर: ₹1,49,000 (GST सहित)

चांदी दर: ₹2,44,000 (GST सहित)

Gold and silver prices fall sharply in bullion market following global economic shifts
VIjay Shivtare | Shivsena शिस्तपालन समितीकडून शिवतारेंना नोटीस, 24तासांत उत्तराचे आदेश |Marathi News

या घसरणीमागे अनेक करणे सांगितली जात आहेत. अमेरिकन बँकांच्या व्याजदर धोरणामुळे डॉलर मजबूत झाला आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांकडून प्रॉफिट बुकिंग करण्यात येत असून जागतिक पातळीवरील तणाव कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे असलेला कलही काहीसा कमी झाला आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि जागतिक तणाव कमी झाल्यामुळे सोन्या-चांदीचे दर खाली आले आहेत. पुढील काळातही दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. अशी माहिती सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com