सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Shivsena Reunion Ambadas Danve Statement Maharashtra Politics: अंबादास दानवे यांच्या विधानामुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुका तोंडावर असतानाच ठाकरेसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र यायला हव्यात, अशी इच्छा दानवे यांनी व्यक्त केली आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विधानाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. सध्या राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन शिवसेना आहेत. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात असून नेमकी शिवसेना कोणाची याचा निकाल अजूनही लागला नाहीये. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चिन्ह मशाल आहे. अशा परिस्थितीत दानवे यांनी एकत्र येण्याबाबतची भूमिका मांडल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com