Credit Card Rules: क्रेडिट कार्डच्या नियमात ५ मोठे बदल; १ एप्रिलपासून थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Credit Card Rule Change: क्रेडिट कार्डच्या नियमात महत्त्वाचे बदल होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवीन नियम लागू होणार आहे. आता क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे पॅन नंबर असणे गरजेचे आहे.
Credit Card Rules
Credit Card RulesSaam Yb
Published On

अनेकजण क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ एप्रिलपासून क्रेडिट कार्डच्या नियमात मोठे बदल होणार आहेत.क्रेडिट कार्डच्या व्यव्हार आणि कर भरण्यासंबंधित नवीन तरतुदी लागू केल्या जाऊ शकतात. यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होतील.

Credit Card Rules
Mumbai Traffic New Rules: काय सांगता! मुंबईत अवजड वाहनांना बंदी, वाहतुकीचे नवीन नियम काय आहेत?

क्रेडिट कार्डचे नियम

क्रेडिट कार्डसंबंधित नियम म्हणजे आता मोठ्या रक्कमेच्या क्रेडिट कार्ड बिल पेमेंटची माहिती आयकर विभागाला दिला जाणार आहे. जर एखाद्याने वर्षभरात १० लाखांपेक्षा जास्त रक्कम क्रेडिट कार्डद्वारे भरली तर त्याची बँक किंवा कंपनी तक्रार करेल. जर १ लाखांपेक्षा जास्त रक्कमेचे बिल रोख भरले तर ते नोंदवले जाईल.

पॅन कार्डबाबत नियम

पॅन कार्डसाठी अर्ज करताना आता तुम्ही पुरावा म्हणून क्रेडिट कार्ड स्टेटमेंट देऊ शकतात. हे स्टेटमेंट तीन महिन्यांपेक्षा जुने नसावे.

डिजिटल पेमेंटबाबत नियम

क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने आयकर भरण्यासाठी डिजिटल पेमेंटचा वापर करु शकतात. यामुळे कर भरणे अधिक सोपे आणि कमी कालावधीत होईल.

क्रेडिट कार्डचा खर्च

जर एखाद्या कंपनीच्या कार्डवर झालेला खर्च म्हणजे मेंबरशिप शुल्क, वार्षिक शुल्क जेव्हा कंपनी परत करते तेव्हा ते करपात्र मानले जाईल. कर्मचाऱ्याने दिलेल्या लाभाच्या मुल्यातून वजा केली जाईल. जर खर्च अधिकृत कारणासाठी असेल तर तो करपात्र नसणार आहे.

Credit Card Rules
Bank Rule Change: १ नोव्हेंबरपासून बँकेचे नियम बदलणार, तुमच्यावर थेट परिणाम, वाचा सरकारने कोणता घेतला निर्णय

क्रेडिट कार्डमधील पाचवा बदल

क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना आता पॅन नंबर देणे गरजेचे आहे. कोणतीही बँक तुम्हाला पॅन कार्डाशिवाय क्रेडिट कार्ड देणार नाही.

Credit Card Rules
Tipu Sultan Controversy: टिपूचं नाव, VOTE BANK साठी धावाधाव; राजकारण्यांचं डोकं ठिकाणावर कधी येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com