Pan Card: पॅन कार्ड हरवलं तर काय केलं पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

पॅन कार्ड हे

भारतात पॅन कार्ड हे अत्यावश्यक डॉक्युमेंट मानलं जातं. बँकिंग व्यवहार असो किंवा आयकर रिटर्न, ते आवश्यक आहे. म्हणून त्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे

पॅन कार्ड हरवणं

अनेकदा आपण पॅन कार्ड हरवतो.अशा वेळी घाबरून न जाता योग्य पावलं उचलणं गरजेचचं आहे. यामुळे पुढील अडचणी टाळता येतात.

तक्रारीची पावती

पॅन कार्ड हरवल्यास सर्वप्रथम जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. ही नोंद तुमच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. तक्रारीची पावती पुढील प्रक्रियेत उपयोगी पडते.

डुप्लिकेट पॅन कार्ड

डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवण्यासाठी NSDL किंवा UTI च्या अधिकृत वेबसाईटवर जा. ही अधिकृत प्रक्रिया असल्याने ती विश्वासार्ह आहे. ऑनलाइन अर्ज करणं सोपं आहे.

पुढची प्रक्रिया

वेबसाईटवर "Reprint PAN Card" या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करा. ही स्टेप डुप्लिकेट कार्ड मिळवण्यासाठी महत्त्वाची आहे.

माहिती अचूक भरा

अर्जात पॅन कार्ड क्रमांकासह सर्व माहिती अचूक भरा. सर्व तपशील भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.

पैसे भरा

अर्ज सबमिट करताना ५० रुपये भरावे लागते. पैसे भरल्यानंतर तुम्हाला पावती मिळते. ही पावती पुढील संदर्भासाठी जपून ठेवा.

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

Gas problem vegetables
येथे क्लिक करा