Tipu Sultan Controversy: टिपूचं नाव, VOTE BANK साठी धावाधाव; राजकारण्यांचं डोकं ठिकाणावर कधी येणार?

Tipu Sultan Controversy In Malegaon: निवडणुकीनंतरही धार्मिक ध्रुवीकरणावरून राजकारण तापत चाललंय. अशातच टिपू सुलतानाच्या नावाने व्होटबँक मिळवण्यासाठी राज्यात नेमकं काय काय सुरु आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Tipu Sultan Controversy In Malegaon:
A political storm erupts after a Tipu Sultan photo controversy inside the Malegaon Municipal Corporation, reigniting debates over religious polarisation and vote bank politics.saam tv
Published On
Summary
  • निवडणुकांनंतरही राज्यातील धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण कायम

  • टिपू सुलतान यांच्या फोटोवरून मालेगावमध्ये वाद

  • मतपेढीच्या राजकारणासाठी मुद्दा तापवल्याचा आरोप

नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकाही झाल्या. मात्र त्यानंतरही राज्यातील सामाजिक धृवीकरणाचं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाही. या धृवीकरणाच्या राजकारणाला कारण ठरलंय टिपू सुलतान यांच्या मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांच्या दालनात लावलेल्या फोटोचं. हा फोटो मालेगाव महापालिका प्रशासनानं काढला. मात्र आता हा फोटो पुन्हा लावण्यात येणार असल्याचा निर्धारच मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी केलाय.

Tipu Sultan Controversy In Malegaon:
उपमहापौराने दालनात लावला टिपू सुलतानचा फोटो; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

याच वादात उडी घेत प्रकाश आंबेडकरांनीही महाराष्ट्राची वाटचाल गोध्राच्या दिशेनं सुरु असल्याचा दावा केलाय. खरंतर निवडणूक काळात मुलभूत प्रश्नांना फाटा देत धार्मिक धृवीकरणावरच निवडणुकीचा आखाडा रंगला. मात्र निवडणुकीनंतर आता मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला आणि तिथूनच वादाची ठिणगी पडली.

Tipu Sultan Controversy In Malegaon:
Malegaon Politics: ज्यांच्या विरोधात लढले त्यांचाच मागितला पाठिंबा? मालेगावातील राजकारण ३६० डिग्री फिरणार; शिंदेंनी थेट ओवौसींकडे मागितला मदतीचा हात

त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य समकक्ष असल्याचं म्हटलं आणि तिथूनच या वादाचा भडका उडाला. सपकाळांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर भाजपनं राज्यभर निषेध आंदोलन केलं. एवढंच नाही तर पुण्यात तर थेट काँग्रेसच्या कार्यालयावरच भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचंही समोर आलंय.

टिपू सुलतानच्या वादात धार्मिक धृवीकरणाची संधी दिसल्यानं भाजप आमदार गोपिचंद पडळकरांनीही यात उडी घेत सपकाळांना फाशी देण्याची मागणी केलीय. राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत.अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर सोयाबीन, कापसाचे भाव पडलेत. शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत. बेरोजगारी वाढत चाललीय. मुलभूत समस्या सुटलेल्या नसताना व्होटबँकेसाठी धार्मिक धृवीकरणाचं राजकारण सुरुय का? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे विकासाऐवजी धृवीकरणाचं राजकारण होत राहिलं तर पुरोगामी महाराष्ट्राची घसरण गायपट्यातील राज्यांच्या पातळीवर झाल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com