Mumbai Traffic New Rules: काय सांगता! मुंबईत अवजड वाहनांना बंदी, वाहतुकीचे नवीन नियम काय आहेत?

Manasvi Choudhary

वाहतूक कोंडी

मुंबईमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची समस्या जाणवत आहे. नागरिकांना तासंतास अडकून बसावे लागते.

Mumbai Traffic

महत्वाचा निर्णय

मुंबईतील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Traffic

नवीन नियम

१ फेब्रुवारीपासून मुंबई शहरात नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत.

Mumbai Traffic

जड वाहनांवर बंदी

मुंबई शहरात जड वाहनांच्या प्रवेशावर वेळेचे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. सकाळी ८ ते ११, सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत मुंबईत जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

Mumbai Traffic

दक्षिण मुंबईमध्ये जड वाहनांना पूर्णत: बंदी

मुंबईच्या दक्षिण भागामध्ये हे नियम आणखी कडक असणार आहेत सकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत सर्व जड वाहनांना पूर्ण बंदी असेल. फक्त अत्यावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे.

Mumbai Traffic | Saam Tv

कधी असणार प्रवेश

जड वाहनांनाफक्त रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेतच प्रवेश मिळणार आहे. लक्झरी बसनाही या भागात बंदी राहणार आहे, मात्र अत्यावश्यक सेवा देणारी वाहनांना प्रवास सुरू असेल.

Mumbai Traffic

फक्त बस सेवा सुरू

मुंबई ईस्टर्न फ्रीवेवर जड वाहनांना पूर्णतः बंदी राहील. फक्त बस सेवा सुरू असेल.

Travel by bus | yandex

या वाहनांना परवानगी

भाजीपाला, दूध, ब्रेड, बेकरी पदार्थ,पिण्याचे पाणी,पेट्रोल, डिझेल, रॉकेल, रुग्णवाहिका, शालेय बस, शासकीय व निमशासकीय वाह, लक्झरी बसना शहरात परवानगी राहणार आहे.

Mumbai Traffic

पार्किंगचे कडक नियम

खासगी, भाड्याच्या किंवा अधिकृत पे- अँड-पार्किंगमध्येच वाहनांना पार्किंग करता येईल. सार्वजनिक रस्त्यांवर पार्किंगला मनाई असेल. पाणी पुरवठा ठिकाणांजवळ फक्त दोन पाण्याचे टँकर थांबू शकतील.

Mumbai Traffic

NEXT: Dusky Skin Lipstick Shades : सावळ्या रंगावर कोणती लिपस्टिक उठून दिसेल?

येथे क्लिक करा...