Manasvi Choudhary
गोरा, सावळा अश्या प्रत्येक रंगानुसार महिला लिपस्टिक शेड्स निवडतात. यानुसार सावळ्या रंगावर कोणत्या रंगाची लिपस्टिक शोभून दिसेल हे जाणून घेऊया.
सावळ्या रंगावर विविध रंगाच्या लिपस्टिक उठून दिसतील.
सावळ्या त्वचेवर अतिशय भडक लाल रंगापेक्षा लाल आणि तपकिरी रंग मिक्स शेड्स उठून दिसतो.
सावळ्या रंगावर गडद चॉकलेट किंवा कॉफी रंगाची लिपस्टिक अत्यंत 'क्लासी' आणि 'बोल्ड' दिसते.
जर तुम्हाला थोडा हटके आणि डार्क लूक हवा असेल, तर जांभळट-लाल किंवा वाईन शेड निवडा. हा रंग सावळ्या त्वचेवर खूप 'सेक्सी' आणि 'कॉन्फिडंट' दिसतो.
गुलाबी रंगात जर तुम्हाला पर्याय हवा असेल, तर बेबी पिंकऐजी 'म्युटेड मॉव्ह' किंवा 'बेरी' शेड्स निवडा. हे रंग सावळ्या स्किन टोनला खूप नैसर्गिक लूक देतात.
जर तुम्हाला 'नो-मेकअप' लूक हवा असेल, तर तुमच्या त्वचेपेक्षा एक शेड डार्क असलेली कॅरमेल किंवा हॅझलनट रंगाची न्यूड लिपस्टिक वापरा.