Manasvi Choudhary
शारीरिक काळजीसह दातांची काळजी घेणे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
चहा, कॉफी प्यायल्यानंतर दात स्वच्छ न केल्यामुळे दातावर पिवळा थर जमा होतो यामुळे दात पिवळे दिसतात.
नियमितपणे दात घासल्यानंतर दात पिवळे दिसत असतील तर घरीच काही सोपे उपाय तुम्ही करू शकता.
बेकिंग सोडामध्ये नैसर्गिक क्लिनिंग गुणधर्म असतात. लिंबाचा रस आणि चिमूटभर बेकिंग सोडा यांची पेस्ट तयार करा आणि दातांवर लावा.
मिठ हे दातांमधील बॅक्टेरिया मारण्यासाठी आणि पिवळेपणा घालवण्यासाठी जुन्या काळापासून वापरले जाते.
केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मँगनीज मुबलक प्रमाणात असते, जे दातांवरील डाग घालवण्यास मदत करतात.
मोहरीच्या तेलात चिमूटभर हळद आणि थोडे मीठ मिसळा. या मिश्रणाने दातांना मसाज करा. यामुळे हिरड्याही मजबूत होतात.
रात्री झोपण्यापूर्वी संत्र्याची साल दातांवर चोळा. रात्रभर त्याचा प्रभाव राहू द्या आणि सकाळी दात धुवा.
दिवसातून दोनदा ब्रश करण्याची सवय लावा. जास्त चहा-कॉफी प्यायल्यानंतर पाणी पिऊन गुळण्या करा.