

नवीन घर खरेदी करायचं प्रत्येकाचच स्वप्न असतं. घराची किंमत, आजुबाजुचा परिसर आणि मिळणाऱ्या सुविधांचा विचार करताना अनेकदा महत्त्वाची कायदेशीर कागदपत्र तपासण्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र मालकी हक्कातले वाद, कर्जाचा बोजा, न्यायालयीन प्रकरण किंवा आवश्यक मंजुरी नसेल तर भविष्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे घरासाठी मोठी रक्कम देण्याआधी काही बाबींची खात्री करणं गरजेचं आहे.
सर्वात आधी संबंधित मालमत्तेवर विक्रेत्याचा मालकी हक्क आहे का, हे तपासा. विक्रेत्याकडून मालकी हक्काची कागदपत्रे तसेच यापूर्वीच्या मालकांची कागदपत्रे मागवा. प्रॉपर्टीचे अनेक मालक असतील तर व्यवहारासाठी सर्व संबंधितांची संमती आणि आवश्यक कागदपत्रे आहेत का, हेही तपासणं महत्त्वाचं आहे.
मालमत्तेवर गृहकर्ज, गहाणखत, हक्कसोडपत्र, न्यायालयीन प्रकरण किंवा अन्य नोंदणीकृत बोजा आहे का, याची खात्री करा. विक्रेता 'मालमत्ता पूर्णपणे बोजामुक्त आहे' असं सांगत असला तरी संबंधित नोंदी तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. आधीचं कर्ज पूर्ण फेडलं असल्याचाही पुरावा घ्या.
विशेषत: बांधकाम सुरू अलेलेले किंवा नवीन घर घेताना विकासकाने सादर केलेला आराखडा आणि संबंधित प्राधिकरणाने मंजूर केलेला आराखडा यांची तुलना करा. घराचे क्षेत्रफळ, बांधकाम, पार्किंग आणि इतर सुविधा मंजूर आराखड्याशी जुळतात का, हे तपासणं गरजेचं आहे.
विक्री करार करण्याआधी घराचे चटई क्षेत्रफळ, एकूण किंमत, पैसे भरण्याचे वेळापत्रक, ताबा देण्याची तारीख, उशील झाल्याचा दंड किंवा व्याज आणि खरेदीदार-विक्रेत्याच्या जबाबदाऱ्या स्पष्ट आहेत का, हे पाहा.
घराचा ताबा मिळाला म्हणजे व्यवहार पूर्ण झाला असं समजू नका. भोगवटा प्रमाणपत्र किंवा बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र लागू असल्यास ते तपासा. मालकी हक्क आणि मालमत्ता हस्त्तांतरणाशी संबंधित अंतिम कागदपत्रे व्यवस्थित आहेत का, याची खात्री करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.