8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! १८,००० असणारा बेसिक पगार थेट ₹६८,९४० होणार? मोठी अपडेट समोर

Salary Hike : आठव्या वेतन आयोगात फिटमेंटनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. १८,००० रुपये बेसिक सॅलरी ३.८३ फॅक्टरनुसार ६८,९४० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Salary Hike
Salary Hikemeta ai
Published On

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता आठव्या वेतनाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल, हे फिटमेंट फॅक्टरनुसार ठरतं. मात्र सध्या फिटमेंट फॅक्टर ठरलेला नाही.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

फिटमेंट फॅक्टर हा जुन्या बेसिक पगाराला नव्या वेतन संरचेत रुपांतरित करण्यासाठी वापरला जाणारा गुणक आहे. यासाठी जुना बेसिक पगार × फिटमेंट फॅक्टर = नवीन बेसिक पगार असं गणित केलं जातं. उदाहरणार्थ सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू झाला होता. त्यामुळे ७००० ची बेसिक सॅलरी वाढून १८,००० रुपये झाली.

Salary Hike
LPG KYC Deadline Extended: LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC ची अंतिम तारीख वाढली, जाणून घ्या नवी तारीख

१.८३ फिटमेंट फॅक्टरवर - ३२,९४० रुपये पगार

२.० फिटमेंट फॅक्टरवर - ३६,०००

२.५७ फिटमेंट फॅक्टरवर - ४६,२६०

३.८३ फिटमेंट फॅक्टरवर - ६८,,९४०

म्हणजेच ३.८३ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यावर १८,००० बेसिक सॅलरी थेट ६८,९४० पर्यंत जाऊ शकते. मात्र हा फक्त संभाव्य अंदाज आहे.

Salary Hike
Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

इतर लेव्हलमध्येही मोठी वाढ

उदाहरणार्थ, लेव्हल ५ मध्ये २९,२०० बेसिक पगार ३.८३ फॅक्टरनुसार १,११,८३६ होऊ शकतो. तर लेव्हल १० मधील ५६,१०० बेसिक पगार २,१४,८६३ पर्यंत जाऊ शकतो. लेव्हल १८ मधील २.५० लाख बेसिक सॅलरी ३.८३ फॅक्टरनुसार ९.५७ लाख होऊ शकतो.

अंतिम निर्णय कधी?

आठव्या केंद्रीय वेतन आयोग सध्या वेगवेगळे कर्मचारी पेन्शनधारक आणि इतर हितधारकांकडून सूचना आणि त्यांची मतं जाणून घेत आहेत. वेतन संरचना, फिटमेंट फॅक्टर, वेतन मॅट्रिक्स, DA, DR, HRA आणि इतर भत्त्यांमध्ये कोणते बदल करायचे, याचा आयोग अभ्यास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com