

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १८ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (DA) २ टक्के वाढ करण्याला मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. या वाढीचा फायदा सुमारे ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि ६५ लाखांहून जास्त निवृत्तीवेतनधारकांना होण्याची शक्यता आहे. वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात, तर पेन्शनधारकांच्या निवृत्तिवेतनातही वाढ होईल.
उदाहरणार्थ, एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार ३६,५०० असल्यास ६० टक्के दराने त्याचा महागाई भत्ता २१,९०० होईल. मात्र प्रत्यक्ष हातात मिळणारा पगार हा फक्त डीएवर अवलंबून नसून HRA, TA आणि इतर भत्ते तसेच कपातींवरही अवलंबून असतो.
DA ची ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना जानेवारीपासूनची थकबाकी मिळू शकते. त्यामुळे वाढीव DA सोबत मागच्या महिन्यांच्या एरियर्सची रक्कमही मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये (HRA) वाढ करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. HRA मध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या एकूण मासिक उप्तन्नात आणखी वाढ होऊ शकते.
महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात. कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यासाठी सरकारकडून वर्षातून दोनदा DA मध्ये सुधारणा केली जाते. ही गणना CPI-IW (Consumer Price Index for Industrial Workers) या महागाई निर्देशांकातील आकडेवारीच्या आधारे केली जाते. आठव्या वेतन आयोगाकडून वेतनरचनेत मोठ्या बदलांची अपेक्षा असताना DA वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.