Sakshi Sunil Jadhav
राजगडाचे जुने नाव मुरुंबदेव होते. छत्रपती शिवाजी महाराज्यांनी १६४७ मध्ये किल्ला जिंकून त्याचा मजबूत गड म्हणून विकास केला.
राजगड हा १६४७ ते १६७४ पर्यंत मराठा साम्राज्याची राजधानी होता. याच काळात गडावरून प्रशासन आणि लष्करी नियोजन केले जात होते.
मुघल आणि आदिलशाही सैन्याने राजगडावर अनेकदा हल्ले केले. मात्र मजबूत तटबंदी आणि भौगोलिक रचनेमुळे किल्ला जिंकणे त्यांना कठीण गेले.
राजगडावर पद्यावती, संजीवनी आणि सुवेळा या तीन प्रमुख माच्या आहेत. मध्यभागी असलेला बालेकिल्ला गडाच्या संरक्षणातील महत्त्वाचा भाग होता.
१६६४ च्या सुरत मोहिमेनंतर मिळालेली संपत्ती राजगडावर सुरक्षित ठेवण्यात आल्याचे संदर्भ आढळतात. त्यामुळे गडाचे आर्थिक आणि प्रशासकीय महत्त्वही स्पष्ट होते.
१६६५ च्या पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांकडे ठेवण्यात आलेल्या १२ किल्ल्यांमध्ये राजगडाचा समावेश होता. यावरून त्याचे सामरिक महत्त्व दिसून येते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांचा जन्म राजगडावर झाला. शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांचे निधनही याच किल्ल्यावर झाले.
शिवाजी महाराजांनी राजगडावरून अनेक लष्करी मोहिमांचे नियोजन केले. सह्याद्रीतील स्थानामुळे गडाला संरक्षण आणि रणनीतीच्या दृष्टीने मोठे महत्त्व होते.
१६७४ मध्ये राजधानी राजगडावरून रायगडावर हलवण्यात आली. त्यानंतरही राजगड मराठा इतिहासातील महत्त्वाचा आणि ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला राहिला.