

यंदा रक्षाबंधन २८ ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजेच २४ ते ३० ऑगस्ट २०२६ हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणार आहे. या काळात सावन पौर्णिमा, रक्षाबंधन आणि चंद्रग्रहणासारख्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. तसेच शुक्र आणि बुधाच्या नक्षत्रातल्या बदलाचा परिणामही विविध राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळू शकतो.
ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजेच २४ ते ३० ऑगस्ट २०२६ हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या काळात श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन आणि चंद्रग्रहणासारख्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. तसेच शुक्र आणि बुधाच्या नक्षत्रातल्या बदलाचा परिणामही विविध राशींवर पाहायला मिळू शकतो.
या आठवड्यात शुक्र चित्रा नक्षत्रात, तर बुध पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याशिवाय सिंह राशीत सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग, सूर्य-बुध-केतूच्या युतीमुळे त्रिग्रही योग आणि गुरूच्या उच्च राशीतील स्थितीमुळे हंसराज योग तयार होत असल्याचं ज्योतिषीय गणित सांगते. त्यामुळे काही राशींना आर्थिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा दिलासादायक ठरू शकतो. काही दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. प्रवासाचे योग असून अचानक धनलाभाची शक्यता आहे. मात्र आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ राशीच्या लोकांच्या अनेक अडचणी कमी होऊ शकतात. रक्षाबंधनानिमित्त घरात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. व्यवसायातून आर्थिक लाभ मिळू शकतो. परदेश प्रवासाचे नियोजन होऊ शकते. मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनातील तणावही कमी होण्याची शक्यता आहे. मात्र कंबरदुखीचा त्रास जाणवू शकतो.
मिथुन, कन्या आणि वृश्चिकसह काही राशींना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा ठरू शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे, महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घेणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सावध राहणे फायदेशीर ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.