Gold Price Today : ग्राहकांसाठी मोठा झटका! सोन्याच्या किमतीत १९,००० रुपयांची वाढ; सोन्याचे किंमतीने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड?

Gold Rate : एमसीएक्सवर सोन्याच्या दरात मोठी तेजी नोंदवली असून ऑगस्टमध्ये भाव १९ हजारांनी वाढला आहे. चांदीही महागली आहे. डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याला आधार मिळत असून पुढील वाढीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
Gold Price Today
Gold Price Today meta ai
Published On

सध्या सोनं चांदीच्या दरात पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या किमतीत या महिन्यात आतापर्यंत तब्बल १९००० रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दरात सलग पाचव्या आठवड्यात तेजी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आता सोन्याचा भाव पुन्हा वाढलेला पाहायला मिळत आहे.

एका आठवड्यात सोनं ८ हजारांनी महागलं

MCX वर गेल्या काही आठवड्यात सोन्याच्या किंमतीत ८ हजार रुपये १० ग्रॅमची वाढ झाली. त्यानंतर सोन्याचा भाव १,६२,४३८ रुपये १० ग्रॅम या पातळीवर पोहोचला. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किमतीत सुमारे १३.३० टक्के म्हणजेच १९ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Price Today
LPG Price Hike : सामान्यांच्या खिशाला पुन्हा झटका? LNG महागलं, आता LPG सिलिंडरचेही दर वाढण्याचे संकेत

२०२६ मध्ये आत्तापर्यंत सोन्याच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ झालेली आहेय. याच वाढत्या किमतीमुळे सोन्याने याआधी झालेली घसरण भरून काढली असून, तो १,८०,७७९ रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे.

Gold Price Today
Ladki Bahin Yojana: जुलै - ऑगस्टचे ३,००० रुपये खात्यात कधी जमा होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी ई-केवाईसीवर दिली मोठी अपडेट

चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ

सोन्यासोबत चांदीच्या किमतीतही जोरदार वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव १०,६७३ रुपयांनी वाढून २,४८,१२४ रुपये प्रति किलो झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांचे लक्ष आता चांदीच्या दराकडेही लागलं आहे. सोन्याच्या दरातली तेजीमागे अमेरिकन डॉलरची कमजोरी हे महत्त्वाचं कारण मानलं आहे. डॉलरचा दर सध्या जवळपास तीन महिन्यात घसरला म्हणून गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com