

एलपीजी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आधार कार्डावर आधारित एलपीजी ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी ग्राहकांना १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. आता ही मुदत वाढवून २३ ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे. त्यामुळे अजून ई-केवायसी न केलेल्या ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे.
स्वातंत्र्यदिन आणि त्यानंतरच्या सुट्ट्यांमुळे बऱ्याच ग्राहकांना वेळेत ई- केवायसी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे ग्राहकांना आणखी काही दिवसांची मुदत वाढवून दिलेली आहे. पण याचा अर्थ ई-केवायसीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं नाही. दिलेल्या मुदतीत सर्वांनी प्रोसेस पूर्ण करणं ग्राहकांसाठी महत्त्वाचं आहे.
ई-केवायसी पूर्ण केली नाही तर लगेच गॅस कनेक्शन बंद होईल, असं नाही. पण, ई-केवायसी न केलेल्या ग्राहकांना घरगुती दरात एलपीजी सिलेंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अनुदानित किंवा घरगुती दराचा लाभ घेण्यासाठी कायम ठेवण्यासाठी ई-केवायसी वेळेत पूर्ण करणे फायदेशीर ठरेल.
ग्राहकांना ई-केवायसीसाठी गॅस एजन्सीमध्ये जाणं गरजेचं नाही. संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत अॅपद्वारे ऑनलाइन प्रोसेस पूर्ण करता येते.
इंडेन ग्राहक: IndianOil ONE अॅपद्वारे आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन.
भारतगॅस ग्राहक:Hello BPCL अॅपद्वारे ई-केवायसी.
HP गॅस ग्राहक: HP PAY अॅपद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येते.
ऑनलाइन ई-केवायसी करताना अडचणी आल्यावर ग्राहक आपल्या एलपीजी वितरकाकडे जाऊनही प्रोसेस पूर्ण करू शकतात. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता २३ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणं योग्य ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.