Gold Price Today: सोन्याने नवा उच्चांक गाठला, आठवडाभरात कितीने वाढ झाली? वाचा 18-22 आणि 24 कॅरेटचे दर

Gold and Silver Prices Rise: सोन्याच्या दरात आठवड्याभरात मोठी वाढ झाली असून २४ कॅरेट सोनं ३,४९० रुपयांनी महागलं आहे. जागतिक बाजारातही ०.९ टक्के वाढ झाली, तर चांदीच्या दरात ५,००० रुपयांनी वाढ झाली आहे.
Gold Price Today
Gold Price Todaymeta ai
Published On

आज १६ ऑगस्ट रोजी सकाळच्या दरानुसार दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५५,२८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,१३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. तसेच स्पॉट गोल्डचा दर ४,३७९.९ डॉलर प्रति औंसवर पोहोचलेला आहे. एका आठवड्यात जागतिक सोन्याच्या किंमतीत ०.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मोठ्या शहरांमधला आजचा सोन्याचा भाव

मुंबई आणि कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४२,२०० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५५,१३० रुपये आहे. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर १,४२,३५० रुपये आहे. चेन्नई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्येही २२ कॅरेट सोन्याचा दर १,४२,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,१३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. अहमदाबाद आणि भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,१८० रुपये आहे.

Gold Price Today
MahaDBT New Schemes : स्वातंत्र्यदिनी २९ नवीन सरकारी योजना महाडीबीटीवर, नागरिकांना १०५ योजनांचा घरबसल्या मिळणार लाभ

चांदीच्या दरातही मोठी वाढ

सोन्यासोबत चांदीच्या किंमतीतही आठवड्याभरात वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यात चांदी ५००० रुपयांनी महागली.

Gold Price Today
Nag Panchami Horoscope : नागपंचमीपासून या 3 राशींचे नशीब अचानक चमकणार; पैशांचा पाऊस पडणार, तुमच्या भाग्यात काय?

१६ ऑगस्टच्या सकाळच्या दरानुसार चांदीचा भाव २,५०,००० रुपये प्रति किलोग्रॅम आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर ६४.८८ डॉलर प्रति औंस आहे. ही आकडेवारी goodreturn नुसार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com