

Bank Holidays in August 2026 : ऑगस्ट महिना सुरू झाला की देशभरातली सणासुदीला सुरूवात होते. शनिवार देशभरात स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर आज रविवार आहे. त्यामुळे आता सोमवारी थेट बँका उघडतील. त्यामुळे बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असण्याची शक्यता आहे. त्यातच ऑगस्टचा हा महिना आता अर्धा संपलाय, उर्वरित १५ दिवसात तुम्हाला तुमची बँकेची कामं पूर्ण करायची असतील, तर सुट्ट्यांची यादी पाहूनच घराबाहेर पडा. कारण, पुढील दोन आठवड्यात सणासुदीमुळे बँकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे तुमचा बँकेत फुकटचा फेरा होऊ शकतो.
आरबीआयच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, या १५ दिवसांत विविध राज्यात तब्बल ७ दिवस बँका बंद असतील. पुढील १५ दिवसांत महाराष्ट्रातही काही दिवस बँका बंद असतील. त्यामुळे बँकेतील तुमची कामे करायची असल्यास सुट्टी पाहूनच घराबाहेर पडा.
रविवार, चौथा शनिवार, जन्माष्टमी, नागपंचमी, रक्षाबंधन, ओनम यासारखे सण देशभरात साजरे होत आहे. प्रत्येक सणानुसार स्थानिक पातळीवर बँका बंद असू शकतात. त्यामुळे सुट्टी न पाहता बँकेत जात असाल तर तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. पुढील १५ दिवसात किती दिवस बँका सुरू असतील, कोणत्या दिवशी सुट्टी असेल, याची यादी आणि सविस्तर माहिती आम्ही देत आहोत.
आरबीआयच्या (RBI) ने दिलेल्या वेळापत्रकानुसार, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुट्ट्या आणि शनिवार रविवारच्या सुट्ट्यांच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत:
१६ ऑगस्ट - रविवार (Sunday) - संपूर्ण देशात सुट्टी
२२ ऑगस्ट - चौथा शनिवार (4th Saturday) - सर्व सरकारी आणि खासगी बँकांना सुट्टी
२३ ऑगस्ट - रविवार (Sunday) - संपूर्ण देशात सुट्टी
२८ ऑगस्ट - पहिले ओणम (First Onam) - या दिवशी केरळमधील बँका बंद
२९ ऑगस्ट - थिरुओणम (Thiruvonam)- या दिवशीही केरळमध्ये बँका बंद राहतील
३० ऑगस्ट - रविवार - संपूर्ण देशात बँकांना सुट्टी
३१ ऑगस्ट - श्रीकृष्ण जन्माष्टमी - युपी, दिल्ली, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्रसह अनेक राज्यांच्या बँका बंद
ओणम हा सण फक्त केरळमध्ये साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी फक्त केरळमधल्याच बँकां बंद राहतील. इतर राज्यांमधल्या बँका नियमितपणे सुरू राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.