Breast Cancer Risk : झोपेची कमतरता, ताण आणि मांसाहारामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, ICMR चा धक्कादायक अहवाल समोर

Womens Health : ICMR अभ्यासात महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाच्या संभाव्य जोखीम घटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अपुरी झोप, ताण, जास्त जास्त BMI , पोटाची चरबी आणि आहाराकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
Breast Cancer Risk
Breast Cancer Riskgoogle
Published On

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांची धावपळ वाढलीये. दिवसभर काम, लांबचा प्रवास, घरची कामे, टेन्शन आणि आहारातही मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. पण याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतोय हे बऱ्याचदा अनेकांना कळतच नाही. त्यातच भारतीय महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं असताना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) अंतर्गत नॅशनल सेंटर ऑफ डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चने केलेल्या अभ्यासातून काही महत्त्वाचे जोखमीचे घटक समोर आले आहेत.

तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार २०२२ मध्ये जगभरात जवळपास २३ लाख महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले, तर ६.७० लाख महिलांचा या आजारामुळे मृत्यू झालाय. भारतात यंदा २,२१,७५७ महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालं. हे महिलांमध्ये असणाऱ्या एकूण कॅन्सरच्या २२.८ टक्के आहे.

Breast Cancer Risk
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी! ८ वा वेतन आयोग लागू होताच 'या' ५ मोठ्या गोष्टी बदलणार; पगार किती वाढणार?

कशामुळे वाढतोय ब्रेस्ट कॅन्सर?

अभ्यासात महिलांचं वय, मेनोपॉजची वेळ, लग्नाचं वय, पहिल्या आणि शेवटच्या बाळाच्या जन्माचं वय, मिसकॅरेजचा इतिहास, स्तनपान, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर आणि हार्मोनल घटकांचाही विचार करण्यात आला. यामध्ये ३० वर्षांनंतर पहिल्या अपत्याचा जन्म, जास्त BMI आणि पोटावरची चरबी ही संभाव्य जोखीम घटक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

तसेच कमी आणि अपूरी झोप, रात्री प्रकाशात झोपणं आणि दीर्घकाळचा ताण यांसारख्या सवयींकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. जास्त प्रमाणात मांस आणि प्रोसेस्ड मीट खाण्याबाबतही सावधगिरी बाळगण्याचे संकेत अभ्यासातून मिळतात.

Breast Cancer Risk
Gold Price Today: सोन्याने नवा उच्चांक गाठला, आठवडाभरात कितीने वाढ झाली? वाचा 18-22 आणि 24 कॅरेटचे दर

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

स्तनाचा आकार किंवा त्वचेत बदल, स्तनामध्ये जाणवणारी गाठ, निप्पलमधून रक्त किंवा असामान्य द्रव येणे, निप्पल आत ओढले जाणे आणि काखेत सूज येणे ही काही संभाव्य लक्षणं आहेत. स्तनामध्ये गाठ आढळली म्हणजे कॅन्सर असं नाही, पणा अशा बदलांची वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे. ब्रेस्ट कॅन्सरवर लगेच उपचार केल्याने उपचार जास्त प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे महिलांनी संशयास्पद लक्षणं जाणवल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य तपासणी करून घ्यावी.

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे. कोणत्याही लक्षणांबाबत किंवा तपासणीबाबत डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com