8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी! ८ वा वेतन आयोग लागू होताच 'या' ५ मोठ्या गोष्टी बदलणार; पगार किती वाढणार?

Central Government Employees : आठवा वेतन आयोग कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या मागण्यांवर चर्चा करत आहे. फिटमेंट फॅक्टर आणि बेसिक सॅलरीचा निर्णय अद्याप बाकी असून, अंतिम अहवालानंतरच नवीन वेतनरचना लागू होईल.
8th Pay Commission
8th Pay Commissionmeta ai
Published On

देशातल्या १ कोटींपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स आठव्या वेतन आयोगाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. सध्या आयोगाकडून कर्मचारी संघटना, पेन्शनर्स आणि विविध विभागांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे नवीन वेतन आणि पेन्शनबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

आठव्या वेतन आयोगाच्या सध्या देशभरात बैठका सुरू आहेत. त्यामध्ये कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या मागण्या समजून घेतल्या जाणार आहेत. चेन्नईमध्ये ७ आणि ८ सप्टेंबरला तर चंदीगडमध्ये १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान बैठका होणार आहेत. जयपूरमध्ये ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरच्या बैठकीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

8th Pay Commission
Chanakya Niti: या 4 लोकांना तुमची कमाई आणि समस्या कधीही सांगू नका, चाणक्यांचा महत्त्वाचा सल्ला

आयोगाच्या कन्सल्टंटच्या नियुक्तीसंदर्भातल्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. आर्थिक आकडेवारी, महागाई आणि विविध भागांमधून येणार्‍या सॅलरी विषयी मागण्यांचा योग्य अभ्यास करण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली आहे.

8th Pay Commission
Nag Panchami Horoscope : नागपंचमीपासून या 3 राशींचे नशीब अचानक चमकणार; पैशांचा पाऊस पडणार, तुमच्या भाग्यात काय?

फिटमेंट फॅक्टरबाबत अजून निर्णय नाही

फिटमेंट फॅक्टरचीही आयोगात महत्त्वाची चर्चा सुरू आहे. सातव्या वेतन आयोगात २.५७ टक्के फिटमेंट फॅक्टर वाढवला होता. कर्मचारी संघटनांकडून ३.६८ ते ३.८३ फिटमेंटची मागणी केली जात आहे. पण आठव्या वेतन आयोगाने अजून अंतिम फिटमेंट फॅक्टर किंवा बेसिक सॅलरी जाहीर केलेली नाही.

कर्मचारी थेट सूचना देऊ शकतात

आयोग कर्मचारी संघटना, पेन्शनर्स आणि विविध विभागांच्या प्रतिनिधींकडून लेखी तसेच तोंडी सूचना घेत आहे. त्यामुळे आपल्या मागण्या थेट आयोगापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत आहे. तर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी हा आयोग तयार करण्यात आला असून याच्या कामाला १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com