

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांची चांदी होणार आहे. सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवतं. त्यातील एक प्रसिद्ध योजना म्हणजे पीएम किसान योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्याशेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. ही रक्कम २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत २३ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे. आता शेतकऱ्यांचं लक्ष २४ व्या हप्त्याकडे लागलं आहे.
पीएम किसान योजनेनुसार साधारण चार महिन्यांच्या अंतराने हप्ता जाहीर केला जातो. २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे २४ वा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबरच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी २४ वा हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. पण या दाव्याचे पीआयबीकडून खंडन करण्यात आलं. त्यामुळे केंद्र सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर होईपर्यंत कोणत्याही मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका.
तुम्हाला २४ वा हप्ता मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे.
१. e-KYC पूर्ण झाली आहे का? हे तपासणे.
२. बँक खातं आधारकार्डाशी लिंक असणे.
३. NPCI-DBT अॅक्टीव्ह असणे.
४. जमिनीच्या नोंदीचे Land Seeding Verification पूर्ण असावे.
५. लाभार्थी म्हणून पात्रता कायम असणं आवश्यक आहे.
शेतकरी e-KYC ही PM-Kisan Portal, मोबाइल अॅप किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन पूर्ण करू शकतात.
शेतकऱ्यांनी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर जाऊन Farmers Corner - Know Your Status हा ऑप्शन निवडावा. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाइल नंबर आणि कॅप्चा भरून स्टेटस तपासता येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.