Ladki Bahin Yojana, June installment update : राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या जून महिन्याच्या हप्त्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. जून महिना संपण्यासाठी अवघे ६ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या महिन्याचे १५०० रुपये बँक खात्यात कधी जमा होणार? असा प्रश्न राज्यभरातील लाडक्या बहिणींना पडला आहे. या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे हप्ते दर महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थेट बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केले जातात. मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रित दिल्यानंतर, मे महिन्याचा निधी १६ जून रोजी जारी करण्यात आला होता. त्यामुळे चालू जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता २८ ते ३० जून दरम्यान अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
योजनेचे पैसे नियमित येण्यासाठी सरकारने काही नियम कडक केले आहेत. ज्या महिलांचे पैसे अद्याप आलेले नाहीत किंवा पुढील हप्ता अडकू नये असे वाटत असेल, त्यांनी बँक खाते आधार लिंक आहे का? हे एकदा तपासून पहावे. तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले (Aadhaar Seeded) असणे अनिवार्य आहे. खाते लिंक नसेल, तर सरकारी योजनेचे पैसे खात्यात जमा होत नाही.
सरकारने ईकेवायसीद्वारे लाडकी बहीण योजनेची छाननी प्रक्रिया पार पाडली. या छाननी प्रक्रियेत अनेक बोगस आणि अपात्र असे ८० लाखांच्या आसपास अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे केवळ पात्र महिलांनाच हा लाभ मिळणार आहे. राज्यातील पात्र महिलांची संख्या एक कोटी ७० लाखांच्या आसपास असल्याची माहिती मिळाली आहे. याच महिलांना जून महिन्याचा लाभ मिळणार आहे.
तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी लाभार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. महिला आपल्या मोबाईलवर 'नारीशक्ती दूत' ॲप किंवा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला (ladakibahin.maharashtra.gov.in) भेट देऊन आपल्या अर्जाची आणि बँक खात्याची स्थिती सहज तपासू शकतात. ( Ladki Bahin Yojana Status Check)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.