Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती पैसे मिळाले? घरबसल्या काही मिनिटांत करा तपास

Ladki Bahin Installment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या सर्व हप्त्यांची माहिती जमा झालेली एकूण रक्कम बँक खात्याची माहिती आणि पेमेंट स्टेटस लाभार्थी महिलांना आता ऑनलाइन सहज तपासता येणार आहे.
Maharashtra Government Scheme
Maharashtra Government Schemegoogle
Published On

लाडकी बहीण योजनेचा आत्तापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. नुकताच मे महिन्याचा हप्ताही लाडकीच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात जमा झाला. पण प्रत्येक महिलेला आत्तापर्यंत किती हप्ते किंवा पैसे मिळालेत? याबद्दल अनेकांच्या महिन्यात संभ्रम आहे. कारण बऱ्याच महिलांचा हप्ता ईकेवायसीमुळे किंवा ते अपात्र असल्यामुळे थांबवण्यात आला. पण तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत ही तपासणी करू शकता.

लाडक्या बहिणीचा हप्ता किती महिलांना मिळाला?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जुलै २०२४ पासून सुरु झाली. सध्या राज्यातल्या सुमारे १ कोटी ७७ लाख महिलांना या योजनेचा लाभ घेत आहेत. दरमहिन्याला या योजनेचे १५०० रुपये दिले जातात. हे पैसे थेट खात्यात पाठवले जातात. (Ladki Bahin Yojana June Installment  ) योजनेला जवळपास दोन वर्षे पूर्ण होत असताना अनेक महिलांच्या मनात आहे की, आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यात एकूण किती रक्कम जमा झालीये? तसेच पैसे कोणत्या खात्यात जमा झाले आणि एखादा हप्ता थांबलाय का, याची माहिती कशी मिळवायची? यासाठी आता लाभार्थ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

Maharashtra Government Scheme
Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी मोठी खुशखबर! आता कुठल्याही रेशन दुकानातून मिळणार धान्य

तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर  https://ladakibahin.maharashtra.gov.in/  जाऊन अर्जदार लॉगिन करून ही माहिती मिळवू शकता. तिथे लॉगिन करण्यासाठी अर्ज भरताना वापरलेला मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन केल्यानंतर अर्जासंबंधित संपूर्ण माहिती पाहता येते. लॉगिन झाल्यानंतर ‘Applications Submitted’ या पर्यायावर क्लिक केल्यावर अर्जाची स्थिती, अर्ज क्रमांक, लाभार्थ्यांचे नाव आणि इतर तपशील दिसतील.  (Ladki Bahin Yojana Maharashtra)

पुढे तुम्हाला Actions या पर्यायावर क्लिक केल्याने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेल्या प्रत्येक हप्त्याची सविस्तर माहिती मिळेल.कोणत्या तारखेला किती रक्कम जमा झाली, ती कोणत्या बँक खात्यात जमा झाली आणि एकूण किती पैसे मिळाले याची माहिती सहज तपासता येते.

Maharashtra Government Scheme
Income Tax Return: करदात्यांनो सावधान! यंदा 'ITR' भरताना 'ही' एक चूक पडेल महाग; थेट येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com