Income Tax Return: करदात्यांनो सावधान! यंदा 'ITR' भरताना 'ही' एक चूक पडेल महाग; थेट येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस

ITR New Rules: आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी आयटीआर फाइलिंगमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. चुकीची माहिती दिल्याने आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.
Income Tax Return
Income Tax Returngoogle
Published On

तुम्ही दरवर्षी आयकर विवरणपत्र (ITR) भरत असाल ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण यावेळी करदात्यांना ITR फाईल करताना काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी आयकर भरण्याच्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत.त्यातच १५ जूनपासून फॉर्म १६ म्हणजे नवीन फॉर्म १३० भरायला सुरुवात झाली आहे.हा फॉर्म मिळाल्यानंतर कर्मचारी त्यांचा आयटीआर दाखल करू शकतात. तर याची शेवटीची तारीख ही ३१ जुलै २०२६ असणार आहे.

यंदा आयकर विभागाने माहितीची पडताळणी जास्त कडक केली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आयटीआरमध्ये दिलेली माहिती बँक खात्याचा नंबर, म्युच्युअल फंड, शेअर व्यवहार, टीडीएस आणि एआयअएस (Annual Information Statement) मधल्या माहितीसोबत जुळवून पाहिली जाईल. त्यामुळे चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यावर तुम्हाला नोटीस पाठवली जाऊ शकते. त्यामुळे ITR फाईल करताना तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे.

Income Tax Return
LPG Connection Update : ...तर ८ दिवसांत तुमचं LPG गॅस कनेक्शन होणार बंद; Indane, HP आणि Bharat गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

ITR-2 फॉर्ममध्ये भांडवली नफ्याची सविस्तर माहिती देणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला शेअर्स किंवा कोणतीही मालमत्ता कधी विकत घेतली, कधी विकली आणि त्यातून तुम्हाला किती नफा झाला किंवा किती तोटा झाला याचा तपशील भरावा लागणार आहे. यात परदेशातल्या मालमत्तेची किंवा बँक खात्याचीही माहिती देणं आवश्यक असणार आहे.

ITR-4 फॉर्ममध्येही काही बदल करण्यात आले आहेत. छोटे व्यावसायिक आणि अनुमानित कर योजनेतल्या करदात्यांना आता दोन घरांमधून मिळणारं उत्पन्न आणि १.२५ लाख रुपयांपर्यंतचा भांडवली नफा दाखवू शकतील. पण ३१ मार्च २०२६ रोजी बँक खात्यात किती शिल्लक रक्कम होती याची माहिती यामध्ये देणे बंधनकारक असणार आहे.

Income Tax Return
LPG Connection Update : ...तर ८ दिवसांत तुमचं LPG गॅस कनेक्शन होणार बंद; Indane, HP आणि Bharat गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com