

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी
नुकताच मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा
जून महिन्याचा हप्ता लवकरच महिलांना मिळणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला.ही योजना सुरु होऊन २ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही योजना कमालीची लोकप्रिय झाली. या योजनेमुळे महिन्याला १५०० रुपयांची मदत महिलांना मिळते. त्यामुळे त्यांना घरखर्चासाठी किंवा महागाईला सामोरं जाणं सोपं होतं. पण आता जुन महिन्याचा हप्ता कधी येणार? असा प्रश्न महिलांच्या मनात आहे.
लाडक्या बहिणीला दर महिन्याला १५०० रुपयांची मदत केली जाते. सरकारने त्यासाठी काही अटीही ठेवल्या आहेत किंवा काही पात्र महिलांनाच त्याचा फायदा मिळणार असं सांगितलं आहे. तर आत्तापर्यंत राज्यात सुमारे १ कोटी ७७ लाख महिला पात्र ठरल्या.
आता मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. तर पुढचा म्हणजेच जून महिन्याचा हप्ता हा वटपौर्णिमेच्या दिवशी जमा होण्याची शक्यता. याच दिवशी लाडकीला वटपौर्णिमेला भेट म्हणून खात्यात १५०० रुपये पाठवले जाऊ शकतात. कारण हा सण महिलांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. सरकारचा हा निर्णय महिलांना नक्कीच खुश करेल. पण अद्याप त्याची खात्री झालेली नाही. तसेच सरकारकडून अधिकृत माहितीही आलेली नाही.
तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झालेला आहे की नाही? हे तपासायचं असेल तर तुम्ही पुढच्या काही स्टेप्स फॉलो करू शकता. त्यामध्ये सर्वात आधी तुम्ही लॉगिन करताना किंवा अर्ज करताना वापरलेला ईमेल आयडी आणि पासवर्ड तुमच्याकडे असायला हवा.
आता तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. मग Applicant login हा ऑप्शन निवडा, तिथे मागितली जाणारी माहिती भरा. तुमचा पासवर्ड टाका. तुम्ही नवीन पासवर्डही तयार करू शकता. ही माहिती सबमिट करा. मग अॅप्लिकेशन्स सबमिटेड मध्ये अॅक्शन या पर्यायवर क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.