

Commercial LPG cylinder price hike today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. कारण व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत. आखाती देशात युद्ध सुरू झाल्यापासून कमर्शिअल सिलिंडरच्या किमतीत तब्बल १,३७३ रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये मागील महिन्यात झालेल्या ९९३ रुपयांच्या मोठ्या वाढीचाही समावेश आहे. या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर या काळात फक्त ६० रुपयांनी वाढले आहेत.
कमर्शिअल सिलिंडर महागला
आजपासून १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईपासून चेन्नई आणि दिल्लीपर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही. पाहूयात प्रमुख शहरातील गॅस सिलिंडरचे दर....
मुंबईत कमर्शिअल सिलिंडर ३,०२४ रुपयांवरून वाढून आता ३,०६७.५० रुपये झाला आहे.
राजधानी दिल्लीत हा सिलिंडर ३,०७१.५० रुपयांऐवजी आता ३,११३.५० रुपयांना मिळणार आहे.
अहमदाबादमध्ये कमर्शिअल सिलिंडर ३,१३५ रुपये झाला आहे.
बेंगळुरूत कमर्शिअल सिलिंडरसाठी आता ३,१९८ रुपये मोजावे लागतील.
चेन्नईत आधी ३,२३७ रुपये असलेला सिलिंडर आजपासून ३,२८३ रुपये झाला आहे.
लखनौमध्ये आजपासून नवीन दर ३,२३६ रुपये झाला आहे.
जयपूरमध्ये कमर्शिअल सिलिंडर ३,१५५ रुपयांना विकला जात आहे.
घरगुती गॅस ग्राहकांना मोठा दिलासा (१४.२ किलो)
देशभरात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्ली आणि इतर शहरांमधील दर स्थिर आहेत. दिल्लीत हा सिलिंडर ९१३ रुपयांना मिळत आहे. अहमदाबादमध्ये घरगुती सिलिंडर ९२० रुपये आणि जयपूरमध्ये ९१६.५ रुपये आहे.
५ किलोचा छोटा घरगुती सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. याची किंमत ३३९ रुपये इतकी झाली आहे. १० किलोचा एक्स्ट्रालाइट सिलिंडर ६५२ रुपयांना उपलब्ध आहे. ५ किलोचा नॉन-डोमेस्टिक (व्यावसायिक) सिलिंडर गॅस भरून (रीफिल) ८२१.५० रुपयांना मिळेल. तर नवीन सिलिंडर घ्यायचा असल्यास १,७६५.५० ते १,७७९.५० रुपयांच्या दरम्यान मिळेल. २ किलोचा एफटीएल सिलिंडर नवीन सिलिंडर १,०६२.५० रुपयांना मिळेल, तर तो पुन्हा भरण्यासाठी (रीफिल) ३५४.५० रुपये लागतील.
कारखाने आणि मोठ्या उद्योगांसाठीचे सिलिंडरही महागले
मोठ्या उद्योगांमध्ये वापरले जाणारे सिलिंडर आज १०५ रुपयांनी महागला आहे. ४७.५ किलोचा सामान्य सिलिंडर १०५ रुपयांत वाढणार आहे. आता हा सिलिंडर ७,७७९.५० रुपयांना मिळणार आहे. ४७.५ किलोचा इंडेन एक्स्ट्रातेज सिलिंडरची किंमत ७,८३६ रुपये झाली आहे. ४२५ किलोचा मोठा सिलिंडरची किंमत ६९,६५१ रुपये निश्चित करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.