

आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली
१ किलो चांदी २०,००० रुपयांनी स्वस्त झाली
१० ग्रॅम चांदीचा दर आज ३,००० रुपये झाला आहे
लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी चांदी खरेदीची चांगली संधी
चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. चांदीच्या दरात बुधवारी वाढ झाली होती. आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोमवार, मंगळवारी चांदीच्या दरात घसरण झाली होती पण बुधवारी दर अचानक वाढले होते त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. आज चांदी पुन्हा स्वस्त झाली. १ किलो चांदीच्या दरात २० हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदीचे दागिने देखील खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.
लग्नसराईच्या काळात सोन्यासोबत चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्याचसोबत गुंतवणूक म्हणून देखील चांदीकडे पाहिले जाते. आज चांदीचे दर कमी झाल्यामुळे गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. आज जर तुम्ही चांदी खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर तुमच्या शहरातील चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात २० रुपयांनी घसरण झाली. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. बुधवारी १ ग्रॅम चांदीचे दर ३२० रुपये इतके होते. तर १ किलो चांदीचे दर तब्बल २०,००० रुपयांनी कमी झाले आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,००,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. बुधवारी १ किलो चांदी ३,२०,००० रुपयांना विकली गेली.
चांदीच्या किमती मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, केरळ, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, कोलकाता या प्रमुख शहरामध्ये सारख्याच आहेत. या शहरांमध्ये चांदीचे दर ३००००० रुपये १ किलो तर ३००० रुपये १० ग्रॅम इतकेच आहेत. चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे आज तुम्ही चांदी खरेदी करू शकता. सोन्यासोबत चांदीच्या दागिन्यांना देखील मोठी मागणी असते. आज चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार नाही.
१ ग्रॅम चांदी - ३०० रुपये
८ ग्रॅम चांदी - २,४०० रुपये
१० ग्रॅम चांदी - ३००० रुपये
१०० ग्रॅम चांदी - ३०,००० रुपये
१००० ग्रॅम चांदी - ३,००,००० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.