Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १० तोळे ५०,२०० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Gold -Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर आज खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण सोनं-चांदी दोघांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आजचे सोनं-चांदीचे दर किती वाचा सविस्तर...
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १० तोळे ५०,२०० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?
Gold Price TodaySaam Tv
Published On

Summary -

  • सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली

  • १० तोळा सोनं ५०,२०० रुपयांनी स्वस्त झालं

  • २२, २४ आणि १८ कॅरेटच्या दरातही मोठी घसरण

  • चांदीचे दर २०,००० रुपयांनी स्वस्त

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. पण आज सोनं आणि चांदी दोघांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. १० तोळा सोन्याचे दर तब्बल ५०,२०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर १ ग्रॅम चांदीचे दर २० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ५,०२० रुपयांनी घसरण झाली आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,५४,४२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. बुधवारी १ तोळा सोनं १,५९,४४० रुपयांना विकले गेले. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल ५०,२०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १५,४४,२०० रुपये खर्च करावे लागणार आहे. बुधवारी हेच सोनं १५,९४, ४०० रुपयांना विकले गेले.

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १० तोळे ५०,२०० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?
Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,६०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,४१,५५० रुपये खर्च करावे लागणार आहे. बुधवारी हे सोनं १,४६,१५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं ४६,००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,१५,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. बुधवारी हे सोनं १४,६१,५०० रुपयांना विकले गेले.

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १० तोळे ५०,२०० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?
Gold Price Today: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, १० तोळे ९०,५०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचा पाहायला मिळत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या ३,७६० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,१५,८२० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३७,६०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,५८,२०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. बुधवारी हे सोनं ११,९५, ८०० रुपयांना विकले गेले.

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १० तोळे ५०,२०० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?
Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, प्रति तोळा इतक्या रूपयांनी महागलं, वाचा 24K,22K आणि 18K चा दर

दरम्यान, सोन्यासोबत आज चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात २० रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल २०,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,००,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. आज सोनं-चांदी खरेदीची सुवर्णसंधी आहे.

१ ग्रॅम सोन्याचे तुमच्या शहरातील आजचे दर -

मुंबई - १५,४४२ रुपये

पुणे- १५,४४२ रुपये

दिल्ली - १५,४५७ रुपये

चेन्नई - १५,६२२ रुपये

बंगळुरू - १५,४४२ रुपये

हैदराबाद - १५,४४२ रुपये

अहमदाबाद - १५,४४७ रुपये

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १० तोळे ५०,२०० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?
Gold and Silver : सर्वसामान्यांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे भाव आणखी कोसळणार? केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com