घरात टाकली धाड; 61 किलो चांदी अन् नोटांचा डोंगर पाहून पोलीस आयुक्तांचे डोळे झाले पांढरे

Kanpur Hawala Racket Busted Cash Silver Seized: कानपूरमध्ये पोलिसांनी मोठ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश करत २ कोटींची रोकड, ६१ किलो चांदी आणि नेपाळी चलन जप्त केले. चार आरोपी अटकेत असून आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा तपास सुरू आहे.
Police officials inspect seized cash, silver bars, and foreign currency during a hawala raid in Kanpur.
Police officials inspect seized cash, silver bars, and foreign currency during a hawala raid in Kanpur.Saam Tv
Published On

कानपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर लगाम घालण्यासाठी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. क्राइम ब्रँचच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धनकुट्टी परिसरातील दाट वस्तीतील एका घरावर छापा टाकत हवाला व बेकायदेशीर चलन व्यवहारांशी संबंधित मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ कोटी रुपयांची रोकड आणि ६१ किलो चांदी जप्त केली असून, या चांदीची बाजारातील किंमतही सुमारे २ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय नेपाळी चलन देखील जप्त करण्यात आले असून, या रॅकेटचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Police officials inspect seized cash, silver bars, and foreign currency during a hawala raid in Kanpur.
Satara Crime: अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून शेततळ्यात फेकले; गर्लफ्रेंडने नवऱ्याच्या मदतीने केलं भयंकर कृत्य

आतापर्यंत चार जणांना अटक

या छापेमारीदरम्यान पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर एका गुप्ता नावाच्या व्यक्तीचे असल्याचे सांगितले जात असून, याच ठिकाणी बेकायदेशीर व्यवहार सुरू होते. कारवाईची माहिती मिळताच पोलिस आयुक्त रघुवीर लाल आणि सहआयुक्त विनोद कुमार यांनीही घटनास्थळी भेट देत संपूर्ण ऑपरेशनवर नजर ठेवून होते.

Police officials inspect seized cash, silver bars, and foreign currency during a hawala raid in Kanpur.
Shocking : धक्कादायक! एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळत नव्हता, विद्यार्थ्याने ग्राईंडरने पायाची बोटे कापली, नेमकं प्रकरण काय? वाचा

वरिष्ठ पोलीस अधिकारी सुमित सुधाकर रामटेके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. ते म्हणाले आम्ही या घरावर छापा टाकून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून सुमारे २ कोटी रुपये रोख, ६१ किलो चांदी आणि नेपाळी चलन जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हे एक मोठे रॅकेट असल्याचे समोर आले असून, यात आणखी काही लोक सहभागी असण्याची शक्यता आहे. आरोपींची सखोल चौकशी सुरू असून, त्यांच्या आकाचा शोध घेतला जात आहे.

Police officials inspect seized cash, silver bars, and foreign currency during a hawala raid in Kanpur.
Nagpur crime : प्रियकराने प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलावलं; अचानक दोघांमध्ये बिनसलं, धारदार शस्त्राने गळाच चिरला

नेपाळपर्यंत नेटवर्क पसरल्याची शक्यता

कानपूरमधील हवाला आणि बेकायदा आर्थिक व्यवहार करणाऱ्या रॅकेटचं कंबरडं मोडण्यासाठी केलेली कारवाई असल्याचे दिसून येते. हे रॅकेट केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नुकसान पोहोचवत नाहीत, तर दहशतवाद, तस्करी आणि इतर गुन्हेगारी कारवायांना आर्थिक रसद पुरवतात. नेपाळी चलनाच्या जप्तीमुळे हे नेटवर्क नेपाळपर्यंत पसरले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बँक खाती, मोबाईल डेटा आणि मालमत्तांची चौकशी सुरू

पोलिस आता आरोपींची बँक खाती, मोबाईल डेटा, मालमत्ताची यांची सखोल तपासणी करत आहेत. या कारवाईमुळे कानपूरमधील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, येत्या काळात आणखी छापेमाऱ्या होण्याची शक्यता असून, अशा रॅकेट्सना मुळासकट उखडून टाकण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com