Satara Crime: अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून शेततळ्यात फेकले; गर्लफ्रेंडने नवऱ्याच्या मदतीने केलं भयंकर कृत्य
Satara Crime Saam Tv

Satara Crime: अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून शेततळ्यात फेकले; गर्लफ्रेंडने नवऱ्याच्या मदतीने केलं भयंकर कृत्य

Satara Police: साताऱ्यामध्ये २८ वर्षीय तरुणाची त्याच्या गर्लफ्रेंडने निर्घृण हत्या केली. या महिलेने आधीचा बॉयफ्रेंड आणि नवऱ्याच्या मदतीने तरुणाचा काटा काढला. डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे केले.
Published on

Summary -

  • अनैतिक संबंधातून साताऱ्यात तरुणाची निर्घृण हत्या

  • लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे

  • मृतदेह नदी आणि शेततळ्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

  • एका महिलेसह तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक

ओंकार कदम, सातारा

साताऱ्यात अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे करून एका गोणीत भरून ते शेत तळ्यात फेकून देण्यात आले. साताऱ्यातील सोमंथळीमध्ये हे हादरवून टाकणारे हत्याकांड घडले. हत्या करण्यात आलेल्या तरुणाच्या गर्लफ्रेंडनेच हे भयंकर कृत्य केले. महिलेने आधीचा बॉयफ्रेंड आणि नवऱ्याच्या मदतीने आताचा बॉयफ्रेंडचा काटा काढला. या हतयाकांडामुळे साताऱ्यात खळबळ उडाली. सातारा पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील सोमंथळी येथे ही थरारक घटना घडली. अनैतिक संबंधांच्या अडथळ्यातून एका २७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. इतकेच नाही तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून ते नदी आणि शेततळ्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Satara Crime: अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून शेततळ्यात फेकले; गर्लफ्रेंडने नवऱ्याच्या मदतीने केलं भयंकर कृत्य
Nagpur crime : प्रियकराने प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलावलं; अचानक दोघांमध्ये बिनसलं, धारदार शस्त्राने गळाच चिरला

सतीश उर्फ आप्पा दादासो दडस असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होतं. या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे. प्रेमसंबंधाच्या त्रिकोणातून फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या प्रियकराला आणि नवऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात एकूण तीन जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Satara Crime: अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून शेततळ्यात फेकले; गर्लफ्रेंडने नवऱ्याच्या मदतीने केलं भयंकर कृत्य
Nagpur crime : प्रियकराने प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलावलं; अचानक दोघांमध्ये बिनसलं, धारदार शस्त्राने गळाच चिरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com